मुंबई : वांद्रे वरळी सी लिंक (BWSL) वर शुक्रवारी पहाटे एका वेगवान फेरारीचे नियंत्रण सुटले (businessman car accident) आणि ती रेलिंगवर आदळली (Car crashed on guardrail) . ही कार समृद्ध खंडेलवाल नावाचा २८ वर्षीय व्यापारी चालवत होता. वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणीही जखमी झाले नसून अद्याप कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. मात्र, पोलिसांनी अपघाताबाबत फक्त स्टेशन डेअरीची नोंद केली आहे. (Businessman Car accident on BWCL), (Latest news from Mumbai), (Mumbai Crime)
ओव्हरस्पीडिंगसाठी चालान बजावण्यात आलेले नाही- चालक मद्यधुंद अवस्थेत नव्हता, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कार खराब झालेल्या अवस्थेत दिसत आहे. विम्याच्या दाव्यासाठी आवश्यक असलेला अपघात अहवाल (TAR) वाहतूक पोलिसांनी दाखल केला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "ती कार वेगात होती आणि आम्हाला संशय आहे की, कारचा वेग नियंत्रणाबाहेर गेला आणि कार रेलिंगला धडकली" असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ओव्हरस्पीडिंगसाठी कोणतेही चालान बजावण्यात आलेले नाही. हा अपघात असल्याने तेथील स्थानिक पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. याआधी ५ ऑक्टोबर रोजी सी लिंकवर मोठी दुर्घटना घडली होती. ज्यात सी लिंक कॉन्ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या पाच जणांना जीव गमवावा लागला होता.