ETV Bharat / state

धावत्या बेस्टचे चाक निखळले; जीवितहानी  नाही - best accident

वरळी बस डेपोमधून यारी रोड, वर्सोवाच्या दिशेने प्रवाशांना घेऊन धावणाऱ्या बसच्या (बस मार्ग क्रमांक ५६) पुढील भागाकडील उजव्या बाजूचा टायर लोखंडी रॉडमधून अचानक निघाला व धावत्या बस समोर आडवा आला. त्यामुळे बस चालकाला बस नियंत्रणात ठेवणे कठीण झाले आणि बसगाडी अभिषेक सोसायटी जवळील बस थांब्याला जाऊन जोरात धडकली.

bus accident in mumbai
टायर निघाल्याने बेस्ट बसचा अपघात
author img

By

Published : Jun 18, 2021, 9:27 AM IST

मुंबई - अंधेरी पश्चिम वर्सोवा येथे बेस्टच्या धावत्या बसचे चाक निखळले. टायर निघाल्याने ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटून बस बाजूच्या स्टॉपवर आदळली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. बेस्ट परिवहन विभागामार्फत या अपघाताची चौकशी केली जात आहे.

बसचा अपघात -

बेस्ट प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास वरळी बस डेपोमधून यारी रोड, वर्सोवाच्या दिशेने प्रवाशांना घेऊन धावणाऱ्या बसच्या (बस मार्ग क्रमांक ५६) पुढील भागाकडील उजव्या बाजूचा टायर लोखंडी रॉडमधून अचानक निघाला व धावत्या बस समोर आडवा आला. त्यामुळे बस चालकाला बस नियंत्रणात ठेवणे कठीण झाले आणि बसगाडी अभिषेक सोसायटी जवळील बस थांब्याला जाऊन जोरात धडकली. त्यामुळे बसथांब्याचे नुकसान झाले तसेच बसची पुढील डाव्या बाजूची मोठी काच फुटली आणि डाव्या बाजूच्या हेडलाईट जवळचा पत्रा दबला. यावेळी याठिकाणी कोणीही नसल्याने सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाही. हा अपघात कसा घडला, धावत्या बसचा टायर कसा निघाला, याची बेस्टकडून चौकशी केली जात आहे. या अपघाताची नोंद नजीकच्या डी. एन. नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा - पावसाच्या साचलेल्या पाण्यात अडकून पडल्याने बेस्टच्या ५० बसेस नादुरुस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.