ETV Bharat / state

मुंबईतील चुनाभट्टीत इमारतीची दुर्दशा; १२३ कुटुंबाचा जीव धोक्यात

चुनाभट्टी येथील ही ३ मजली इमारत गिरणी कामगारांसाठी उभी करण्यात आली होती. मात्र, सध्या ही इमारत जीर्ण व धोकादायक झाली आहे. या इमारतीच्या छतातून देखील पाण्याची गळती होत आहे. या इमारतीचे प्रकरण देखील न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे रहिवाशी न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा करीत आहेत.

मुंबईतील चुनाभट्टीत इमारतीची दुर्दशा; १२३ कुटुंबाचा जीव धोक्यात
author img

By

Published : Jul 30, 2019, 9:57 PM IST

Updated : Jul 30, 2019, 11:33 PM IST

मुंबई - शहरातील चुनाभट्टी परिसरात ८० वर्षांपासून उभी असलेल्या इमारतीची दुर्दशा झालेली आहे. या इमारतीच्या सर्व बाजूचे कठडे तुटले आहेत. त्यामुळे रहिवासी जीव धोक्यात घालून दोरीचा आधार दररोज ये-जा करतात. दररोज कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही. त्यामुळे १२३ कुटूंबे भितीच्या छायेत जगत आहेत.

मुंबईतील चुनाभट्टीत इमारतीची दुर्दशा; १२३ कुटुंबाचा जीव धोक्यात

नुकतीच डोंगरी येथे इमारतीच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, पुनर्वसन चांगल्या ठिकाणी होत नसल्याने मुंबई शहर व उपनगरातील जीर्ण इमारतींमध्ये हजारो कुटूंब राहत आहेत. चुनाभट्टी येथील ही ३ मजली इमारत गिरणी कामगारांसाठी उभी करण्यात आली होती. मात्र, सध्या ही इमारत जीर्ण व धोकादायक झाली आहे. या इमारतीच्या छतातून देखील पाण्याची गळती होत आहे. या इमारतीचे प्रकरण देखील न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे रहिवाशी न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा करीत आहेत.

चुनाभट्टीतील या इमारतीत गिरणी कामगार १२३ कुटूंब वास्तव्यास आहे. यापूर्वी येथे २५० कुटूंब राहत होते. मात्र, काहींनी घरे भाड्याने दिली आहेत, तर काही लोक इमारत सोडून गेले आहेत. मात्र, इमारतीची अवस्था बदलेल या आशेने आम्ही आजही या धोकादायक इमारतीमध्ये राहत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. तसेच शहरात इमारती कोसळल्याच्या दुर्घटना ऐकल्या की मनात धडकी भरत असल्याचे रहिवाशी म्हणाले.

Intro:चुंनाभट्टीत रहिवाशी धोकादायक इमारतीत जीव धोक्यात घालून वास्तव्यास

मुंबईत सुमारे 80 वर्षांपूर्वीची जुनी व जीर्ण 3 मजली इमारत धोकादायक ठरवलेली चुंनाभट्टी परिसरातील टाटा नगर इमारतीची दुर्दशा झाली आहे. रहिवासी या इमारतीस सोडून जाण्यास तयार नाहीत. परिणामी,मुंबईत कोसळणाऱ्या पावसात या धोकादायक इमारतीत 123 कुटुंबे भीतीच्या छायेत जगत आहेत. या इमारतीच्या सर्व बाजूचे गॅलरीचे कठडे तूटन अर्धवट झाले असून यावरूनच रहिवाशी जीव धोक्यात घालून रस्सीचा आधार घेत दररोज ये-जा करत आहेBody:चुंनाभट्टीत रहिवाशी धोकादायक इमारतीत जीव धोक्यात घालून वास्तव्यास

मुंबईत सुमारे 80 वर्षांपूर्वीची जुनी व जीर्ण 3 मजली इमारत धोकादायक ठरवलेली चुंनाभट्टी परिसरातील टाटा नगर इमारतीची दुर्दशा झाली आहे. रहिवासी या इमारतीस सोडून जाण्यास तयार नाहीत. परिणामी,मुंबईत कोसळणाऱ्या पावसात या धोकादायक इमारतीत 123 कुटुंबे भीतीच्या छायेत जगत आहेत. या इमारतीच्या सर्व बाजूचे गॅलरीचे कठडे तूटन अर्धवट झाले असून यावरूनच रहिवाशी जीव धोक्यात घालून रस्सीचा आधार घेत दररोज ये-जा करत आहे.

नुकतीच डोंगरी येथील इमारतीच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील जीर्ण इमारती मोडकळीस आलेल्या इमारतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा जीर्ण इमारतीमध्ये मुंबई शहर व उपनगरात हजारो कुटुंब पुनर्वसन चांगल्या प्रकारे होत नसल्याने धोका पत्करून राहत आहेत .अशीच ही चुनाभट्टी तील 3 मजली इमारत आहे ही इमारत उभी करते वेळेस गिरणी कामगारांसाठी उभी करण्यात आली होती.पण ती सध्या स्थितीत जीर्ण व धोकादायक झाल्यामुळे आणि या इमारतीचे प्रकरणही न्यायप्रविष्ठ असल्याने येथील रहिवासी न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष देत या इमारतीत वास्तव्य करून राहत आहेत.

या टाटांनगरच्या इमारतीत गिरणी कामगार व त्यांचे कुटुंबीय राहत असून साधारण 123 कुटुंब सध्या येथे वास्तव करत आहेत. यापूर्वी २५० कुटुंब येथे राहत होते. मात्र काहींनी घरे भाड्याने दिली असून काही लोकं इमारत सोडून गेलेले असल्याचे राहिवाश्यांचे म्हणणे आहे. आम्ही या धोकादायक इमारतीत राहत असून या इमारतीची अवस्था कधी बदलेल हे ठाऊक नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवासी व्यक्त करीत आहेत.मात्र पावसात छतातून पाण्याची गळती होऊ नये म्हणून काळजीने त्या खाली घरातील छोटेमोठे भांडे लावून पाणी भरून काढत आहोत. येथील रहिवाशांना शहरात कुठे ना कुठे आमची व्यवस्था केली जाईल अशी आशा आहे. यातच शहरात होत असलेल्या इमारत दुर्घटना झाल्या व त्यांची काही बातमी समजली तर मनात भीती भरते असे रहिवासी सांगत आहेत.

Conclusion:
Last Updated : Jul 30, 2019, 11:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.