मुंबई - शहरातील वांद्रे पश्चिम येथील रिझवी कॉलेजजवळ असलेली एक इमारत शेजारील घरांवर कोसळल्याची दुर्घटना घडली. बाजूच्या घरांवर मलबा पडल्याने दोन रहिवासी जखमी झाले आहेत. त्यांना आपत्ती निवारण पथकाने तत्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. बचावकार्य पूर्ण झाल्याचे अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी शशिकांत काळे यांनी सांगितले.
काल(सोमवार) रात्री 8. 30 च्या सुमारास एक रिक्त इमारत कोसळली. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. घरांवर मलबा कोसळल्याने अनेक जण इमारतीखाली अडकल्याची भीती सुरुवातील व्यक्त करण्यात आली होती. मात्र, या घटनेत दोघजण जखमी झाले आहेत.
जखमींवर उपचार सुरु
या घटनेत पायाला जखम झालेले लुई मायकल डिसूजा (४१) व डोक्याला जखम झालेले अर्जुन पंडित (२२) या दोन रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यांना लीलावती व भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपतकालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
-
Rescue operation is over. Two persons who were rescued by fire brigade have been admitted to hospital: Shashikant Kale, Chief Fire Officer, Mumbai Fire Brigade. #Maharashtra https://t.co/uncemXLucy pic.twitter.com/4IQz6P94sP
— ANI (@ANI) August 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Rescue operation is over. Two persons who were rescued by fire brigade have been admitted to hospital: Shashikant Kale, Chief Fire Officer, Mumbai Fire Brigade. #Maharashtra https://t.co/uncemXLucy pic.twitter.com/4IQz6P94sP
— ANI (@ANI) August 17, 2020Rescue operation is over. Two persons who were rescued by fire brigade have been admitted to hospital: Shashikant Kale, Chief Fire Officer, Mumbai Fire Brigade. #Maharashtra https://t.co/uncemXLucy pic.twitter.com/4IQz6P94sP
— ANI (@ANI) August 17, 2020
मुंबई अग्निशमन दलाकडून बचाव कार्य राबविण्यात आले. अडकलेल्या व्यक्तींना तत्काळ बाहेर काढून रुग्णालयात हलविण्यात आले. आठ अग्निशामक दलाच्या गाड्या बचावकार्यासाठी बोलविण्यात आल्या होत्या. स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी गर्दी केली होती. सीएसएमटी येथील भानुशाली आणि वरळी येथील अविष्कार या दोन इमारती एकाच महिन्यात कोसळल्या होत्या. या दोन इमारती कोसळण्याची घटना ताजी असतानाच वांद्रे पश्चिम येथे आणखी एक दुर्घटना घडली.