ETV Bharat / state

British Embassy Secretary Car Accident : ब्रिटिश दूतावासाच्या सचिवांच्या कारला अपघात; खासगी बस चालकावर गुन्हा - मुंबईत कार बसचा अपघात

British Embassy Secretary Car Accident : ब्रिटिश दूतावासाच्या सचिवांच्या कारचा अपघात झाला. याप्रकरणी खासगी बस चालकावर वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बेजबाबदारपणे गाडी चालवणे आणि लोकांचा जीव धोक्यात आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Mumbai Car Accident
कारला अपघात
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 7:46 AM IST

Updated : Sep 17, 2023, 8:15 AM IST

मुंबई : British Embassy Secretary Car Accident : वांद्रे येथे ब्रिटिश दूतावास यांच्या सचिवाच्या कारला धडक (Car And Private Bus Accident) दिल्याप्रकरणी एका खासगी बस चालकाविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पिराजी वैजनाथ बिगणे असे या चालकाचे नाव असून, तो बीडच्या परळी, वैजनाथचा रहिवाशी आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता वांद्रे येथील एमएसआरडीसी कार्यालयासमोर झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

असा घडला अपघात : 15 सप्टेंबरला रात्री 8:30 वाजता ब्रिटीश दूतावासाचे सचिव इकोटो इंग्मन हे बीकेसीहून वांद्रे पश्चिमेकडे एमएसआरडीसी कार्यालयाजवळील त्यांच्या निवासस्थानाकडे जात होते. यावेळी अशोका लेलँड कंपनीच्या बसचा (MG-01 -EE-9504) अचानक वेग वाढवला आणि अपघात झाला. याप्रकरणी चालकाविरुद्ध कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग) आणि 336 (जीव धोक्यात आणणारी कृत्ये) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पिराजी ब्रिगणे (३३, रा. बीड, महाराष्ट्र) असे आरोपीचे नाव आहे.

ब्रिटिश दुतावासाच्या सचिवांच्या कारला अपघात : स्वप्निल प्रभाकर चव्हाण हे चेंबूरच्या सुभाषनगरचे रहिवाशी असून ते ब्रिटीश दूतावास कार्यालयातील सचिव अकोटो ऍजमन यांच्याकडे चालक म्हणून काम करतात. शुक्रवारी ते अकोटो यांना त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी सोडण्यासाठी त्यांच्या कारने जात होते. ही कार रात्री साडेआठ वाजता एमएसआरडीसी कार्यालयासमोर आली असता, अशोक लेलॅण्ड कंपनीच्या एका बसने त्यांच्या कारला धडक दिली. अपघातात त्यांच्या कारचे प्रचंड नुकसान झाले, मात्र, यात कोणीही जखमी झाले नाही. अपघाताची माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी स्वप्निल चव्हाण यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बसचालक पिराजी बिगणे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा दाखल होताच बसचालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर त्याला सोडून देण्यात आले.

हेही वाचा -

  1. Satara Accident News : आयशर टेम्पो आणि मालट्रकचा भीषण अपघात; ३ जागीच ठार
  2. Road Accident In Chandrapur : भरधाव दुचाकीची तरुणाला धडक; नागपूर-चंद्रपूर महामार्गावर पुन्हा एका तरुणाचा मृत्यू
  3. Car Tempo Accident : पुण्यात कार अन् टेम्पोची समोरासमोर धडक; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

Last Updated : Sep 17, 2023, 8:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.