ETV Bharat / state

Marathi Breaking News : मतदानाच्या पूर्वसंध्येला साड्या आणि पैशांचे वाटप, नरवाड येथील धक्कादायक प्रकार - महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या

Breaking News
Breaking News
author img

By

Published : Dec 17, 2022, 7:12 AM IST

Updated : Dec 17, 2022, 9:05 PM IST

21:03 December 17

तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणारा कृषी पर्यवेक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

अमरावती - कृषी विभागाच्या योजनेतून मंजूर झालेले पावर टिलर व स्प्रिंकलरवर मिळणा-या सबसिडी मंजूर करण्यासाठी तिन हजार रुपयाची लाच घेणाऱ्या कृषी पर्यवेक्षकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडलेआहे. तक्रारदार यांच्या वडिलांच्या नांवावर राज्य कृषी यांत्रीकिकरण योजने अंतर्गत पावर टिलर व स्प्रिंकलर या घटकासाठी राज्य शासनाच्या महा डीबीटी पोर्टलवर सादर केलेल्या पावर टिलर अर्जाची लकीड्रामध्ये निवड झाल्याने तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या पावर टिलर वर व् स्प्रिंकलर वर शासकिय नियमानूसार सबसिडी मिळण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करुन सबसिडी मंजुरीसाठी व पुढे सादर करण्यासाठी तालुका कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक शामकुमार ज्ञानदेव काळे यांनी १६ डिसेंबर रोजी 3000 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

21:03 December 17

मतदानाच्या पूर्वसंध्येला साड्या आणि पैशांचे वाटप, नरवाड येथील धक्कादायक प्रकार

सांगली - मतदानाच्या पूर्वसंध्येला सांगलीच्या मिरज तालुक्यामध्ये साड्या आणि पैसे वाटप करण्यात आल्याच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आचारसंहिता भरारी पथकाला याची माहिती मिळाल्यानंतर पथकाकडून नरवाड गावामध्ये दाखल होऊन रस्त्यावर साड्या आणि पैशांच्या नोटा आढळून आले आहेत,पथकाकडून या साड्या आणि पाचशे रुपयांच्या दोन नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.अत्यंत चुरशीने नरवाडे ग्रामपंचायतची निवडणूक पार पडत आहे.आणि या निवडणुकीमध्ये मतदानासाठी मतदारांना आमिष म्हणून साड्या आणि पैसे वाटप सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर भरारी पथक गावात दाखल झाल्यानंतर, रस्त्यावर साड्या आणि साड्यांच्या आत लपवलेले पाचशे रुपयेच्या नोटा फेकून दिले आहेत.

19:56 December 17

बेशरम रंग या गाण्यातील भगव्या पोशाखावरून पोलिसात तक्रार दाखल

मुंबई - पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यातील अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या भगव्या पोशाखावरून साकीनाका पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराने चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आणि अभिनेत्री यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी अद्याप एफआयआर नोंदवलेली नाही.

19:29 December 17

आमदार प्रसाद लाड यांना आर्थिक गुन्हे शाखेची क्लीन चिट

मुंबई - पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांना 2014 मध्ये बीएमसी करार फसवणूक केल्याप्रकरणी क्लीन चिट दिली आहे. यामध्ये वादग्रस्त बिल्डर आणि व्यापारी बिमल अग्रवाल यांची करोडोंची फसवणूक केल्याचा दावा केला होता.

18:36 December 17

हिंदुत्ववादी संघटनांचा उद्या अमरावतीत महामोर्चा

अमरावती - लव्ह जिहाद आणि धर्मांतर कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचा उद्या महामोर्चा निघणार आहे. सकळी 11 ला मोर्चा सुरू होईल.

18:18 December 17

पीएफआय प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांची मुदतवाढ

मुंबई - प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पाच सदस्यांच्या अटकेप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) आरोपपत्र दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयाने 30 दिवसांची मुदतवाढ दिली. कथित बेकायदेशीर कृत्य आणि देशाविरूद्ध युद्ध पुकारल्याच्या कलमाखाली त्यांना अटक केली आहे.

18:16 December 17

हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर शहरात कडेकोट बंदोबस्त

नागपूर - विधिमंडळाचे सोमवारपासून सुरू होणार आहे. हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पडावे यासाठी सुमारे 7,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, अधिवेशन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सज्ज आहेत.

17:25 December 17

नागरिकांच्या स्वातंत्र्याचे रक्षक म्हणून आमच्यावर विश्वास ठेवा - चंद्रचूड

मुंबई - नागरिकांना स्वातंत्र्य बहाल करण्यासाठी न्यायालये आणि न्यायप्रक्रियेवर नागरिकांचा विश्वास आहे. त्याचे पाईक तसेच स्वातंत्र्याचे रक्षक म्हणून न्यायालये काम करत आहेत, त्यांच्यावर नागरिकांचा विश्वास आहे, असे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. ते येथे एका व्याखानमालेत बोलत होते.

17:12 December 17

सुषमा अंधारेंच्या वक्तव्याचा निषेध, ठाण्यातील काही भागात बंद

ठाणे - संत आणि हिंदू देवतांबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ वारकरी समाजाने दिलेल्या बंदच्या हाकेला प्रतिसाद म्हणून ठाणे शहर आणि शेजारील कल्याण, डोंबिवली शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठाने शनिवारी बंद राहिली. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या निषेधार्थ या बंदची हाक दिली होती.

16:39 December 17

चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी

मुंबई - राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार राम कदम, मुंबई पोलीस आयुक्त यांच्यासह इतरसह आरोपी म्हणून यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसापूर्वी महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याविरोधात भीम आर्मी राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळेंकडून ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सदर याचिकेवर मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीस ए पी कनाडे यांच्या कोर्टासमोर सुनावणी होणार आहे.

16:17 December 17

दहिसरमध्ये बारवर छापा, गुप्त जागेत लपलेल्या महिला सापडल्या; 25 जणांना अटक

मुंबई : दहिसर भागातील एका रेस्टॉरंट-कम-बारवर छापा टाकण्यात आला. यामध्ये अनेक महिलांची खास बांधलेल्या गुप्तगृहातून सुटका करण्यात आली. तर काही महिला नाचताना आढळल्या, असे एका पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. दहिसर पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी झालेल्या छाप्यात व्यवस्थापकासह 19 ग्राहक आणि सहा कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

16:02 December 17

हेमंत संखे यांची सरपंच परिषदेच्या पालघर जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती

पालघर - दापोलीचे नवनिर्वाचित सरपंच हेमंत दिनकर संखे यांची सरपंच परिषदेच्या पालघर जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासह इतर क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

14:39 December 17

विश्वास इमारतीच्या मीटर बॉक्सला आग

मुंबई - घाटकोपर येथील पारेख हॉस्पिटलजवळ विश्वास इमारतीच्या मीटर बॉक्सला आग लागली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल आहे. मुंबई पोलीस तसेच पालिका अधिकारी घटनास्थळी गेले आहेत. या आगीत कोणीही जखमी नसल्याची माहिती नाही.

14:34 December 17

पुण्याजवळ वडूमध्ये एआयएम कंपनीत आग, 2 कर्मचारी जखमी

पुणे : वडूमध्ये एआयएम कंपनीत आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाकडून 6 वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग मोठी असल्याने ती विझवण्यासाठी अग्निशामक दलाला मोठी कसरत करावी लागत आहे.

14:05 December 17

महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल पाहिला नाही - शरद पवार

मुंबई - आजवर अनेक राज्यातील राज्यपाल पाहिले. त्यापैकी महाराष्ट्रातील राज्यपालांनी नावलौकिक वाढवला. मात्र असे राज्यपाल आजपर्यंत पाहिले नाहीत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी लगावला. मोर्च्याच्या माध्यमातून त्यांची हकालपट्टी करा असेही ते म्हणाले. अन्यथा महाराष्ट्र पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही पवारांनी दिला. डॉ. बाबासाहेब, कर्मवीर भाऊराव पाटील, फुले यांनी शिक्षणाची दालने खुली करून दिली. त्यांचा अवमान कदापी सहन केला जाणार नाही.

13:59 December 17

पुतळ्याला आग लावताना आगीचा भडका, खासदारांचा हात भाजला

नांदेड - पाकिस्तानच्या विदेश मंत्र्यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन सुरू होते. यावेळी पुतळ्याला आग लावताना आगीचा भडका उडून खासदारांचा हात भाजला. जवळ असलेल्या कार्यकर्त्यांनी तात्काळ आग विझवल्याने अनर्थ टळला. पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधनाविरोधात नांदेडमध्ये भाजपने निदर्शने केली. यावेळी भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे आग लावत होते. त्यावेळी अचानक आगीचा भडका उडाला. भडका उडाल्याने चिखलीकर यांच्या हातावरील कपड्याने पेट घेतला. जवळ उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी तात्काळ आग विझवली. या घटनेत चिखलीकर यांचा हात किरकोळ भाजला आहे.

13:56 December 17

अनिल देशमुख यांच्या जामीनाविरोधात सीबीआय सर्वोच्च न्यायालयात

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनाविरोधात सीबीआय सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनाला सीबीआयने आव्हान दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आपल्याच निकालाला 10 दिवसांची स्थगिती दिली होती. मात्र यावर सर्वोच न्यायालयाच्या निर्णयानंतर निश्चित होणार की देशमुख कधी जेल मधून बाहेर येणार की नाही.

13:52 December 17

राणा दाम्पत्याविरोधातील वॉरंट न्यायालयाकडून रद्द

मुंबई - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधात काढलेले जामीन पात्र वॉरंट न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे. त्यांनी 5000 रुपये अनामत रक्कम भरून जामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आले. हनुमान चालिसा पठण प्रकरणात सुनावणी दरम्यान उपस्थित न राहिल्यामुळे दुसऱ्यांदा दोघांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते.

13:10 December 17

राज्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये - दिलीप वळसे पाटील

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. सावित्रीबाई फुले आणि इतर महान व्यक्तींच्या विरोधात काहीही बोलल्यास महाराष्ट्रातील जनता खपवून घेणार नाही. शिंदे सरकारला आमचा संदेश आहे की त्यांनी राज्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी हा इशारा दिला आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चात सहभागी झाल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

12:41 December 17

नवनीत राणा आणि रवी राणा मुंबई सत्र न्यायालयात हजर

मुंबई - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज दोघेही मुंबई सत्र न्यायालयात दाखल झाले. हनुमान चालिसा पठण प्रकरणात सुनावणी दरम्यान उपस्थित न राहिल्यामुळे दुसऱ्यांदा दोघांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे. वॉरंट रद्द करून घेण्यासाठी दोघेही आज कोर्टात हजर झाले आहेत. विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या कोर्टासमोर नवनीत राणा आणि रवी राणा उपस्थित आहेत.

12:34 December 17

आफताब पूनावालाच्या जामीन याचिकेवर आता २२ डिसेंबरला सुनावणी

नवी दिल्ली - आफताब पुनावालाच्या जामिन अर्जावर आता 22 डिसेंबरला सुनावणी होईल. लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरचा गळा दाबून त्याने खून केला होता. तिच्या शरीराचे तुकडे केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. त्याने शनिवारी येथील न्यायालयाला सांगितले की, त्याने वकीलपत्रावर स्वाक्षरी केली होती. परंतु जामीनासाठी अर्ज केला जाईल हे माहीत नव्हते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आजची सुनवाणी झाली.

12:25 December 17

मुंबईत 18 डिसेम्बर रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक

मुंबई - मध्य रेल्वे, मुंबई विभागाच्यावतीने 18 डिसेंबरला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाण्याची सूचना जरी केली आहे. माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत असेल तर सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान थांबेल आणि पुढे मुलुंडहून वळवण्यात येईल. डाऊन स्लो लाईनकडे नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचेल.

12:12 December 17

पोलिसांची व भाजप कार्यकर्त्यांची झटापट

सोलापूर - पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा दहन करताना पोलिसांची व भाजप कार्यकर्त्यांची झटापट. भुट्टो यांच्या निषेधार्थ पाकिस्तानचा पुतळा जाळण्यात येत होता. पोलिसांना बाजूला सारून भाजपने पाकिस्तानच्या पुतळ्याचे दहन केले.

12:09 December 17

सांताक्रूझमध्ये काल नोंदले गेले दिसभरातील सर्वाधिक तापमान

मुंबई - मुंबईतील सांताक्रूझ येथे ३५.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. संपूर्ण देशातील काल नोंदलेल्या तापमानामधेय हे सर्वाधिक तापमान होते. भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली आहे.

12:03 December 17

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांचा मुंबईत निषेध

मुंबई - पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाने निषेध केला. मुंबई भाजपच्या वतीने आज त्यासाठी निषेध आंदोलन करण्यात आले.

12:00 December 17

बिल्किस बानो प्रकरणी पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने बिल्किस बानो प्रकरणाच्या आधीच्या आदेशाचा पुनर्विचार करण्याची याचिका फेटाळून लावली. गुजरात सरकारला 1992 च्या बलात्कार आणि इतर प्रकरणातील दोषींच्या माफीच्या याचिकेवर फेरविचार करण्याची विनंती केली होती.

11:53 December 17

धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा

बीड - धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा. 18 पैकी 17 जागेवर भाजपचे उमेदवार विजयी.

11:51 December 17

बिलोली तालुक्यातील शिंपाळा येथील सव्वाशे नागरिकांना जुलाब-उलट्यांचा त्रास

नांदेड - बिलोली तालुक्यातील मौजे शिंपाळा येथे तीन दिवसांपासून गावातील शंभर ते सव्वाशे गावकऱ्यांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास होत आहे. या गावकऱ्यांवर बिलोली येथील उपजिल्हा रुग्णालय व सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. आरोग्य विभागाने गावातच तळ ठोकला आहे. पाण्यासह अन्य काहींचे नमुने तपासणीसाठी पाठविल्याची माहिती डॉ. वैभव रामपुरे यांनी दिली. अन्नातून झालेल्या विषबाधामुळे हे घडले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

11:48 December 17

बिल्डर जगदीश आहुजा यांना पंजाबमधून अटक

मुंबई पोलिसांनी EOW बिल्डर जगदीश आहुजा यांना पंजाबमधून अटक केली आहे. तो EOW सह फसवणुकीच्या 3 प्रकरणात हवा आहे. दोन्ही पितापुत्रांनी खोटी आश्वासने देऊन कोट्यवधींची फसवणूक केली आहे. त्यांचा मुलगा गौतम आहुजा हा फरार आहे.

10:45 December 17

Breaking: थोड्याच वेळात महाविकास आघाडीच्या महामोर्चाला सुरुवात

मुंबई - आजच्या महाविकास आघाडीच्या महामोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. तीन्ही पक्षाचे नेते नियोजीत ठिकाणी दाखल होत आहेत.

07:53 December 17

Breaking: महाविकास आघाडीच्या महामोर्चाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण गैरहजर राहणार

मुंबई - महाविकास आघाडीकडून आज मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्चात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्र्वादी काँग्रेसह इतर घटक पक्षही सहभागी होणार आहेत. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण या महामोर्चाला गैरहजर राहणार आहेत. त्यांनी याबाबत ट्विट करत आपण एका लग्न सोहळ्यामुळे या मोर्चाला हजर राहू शकत नाहीत असे कळवले आहे.

06:34 December 17

Breaking News : आज कल्याणमध्ये सरकारचा महारोजगार मेळावा; 13 हजार 109 पदांवर नोकरीची संधी, थेट मुलाखती अन् भरती

मुंबई - आज कल्याणमध्ये सरकारचा महारोजगार मेळावा होत असून, त्यामध्ये 13 हजार 109 पदांवर नोकरीची थेट संधी उपलब्ध होणार आहे. तसेच, येथे मुलाखती अन् लगेच भरती अशीही प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Last Updated : Dec 17, 2022, 9:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.