बलात्कारासारख्या भीषण गुन्ह्यामध्ये पीडितेचे नावं उघड केल्याप्रकरणी याचिकेचा मसुदा तयार करणाऱ्या विधी व्यावसायिक संस्थेला उच्च न्यायालयाने नुकताच 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. वकिलांना वारंवार सांगूनही बलात्कार पीडितेचे नाव उघड करण्यात आले पीडितेचे नाव उघड करणे दोन वर्षांच्या तुरुंगवासासह दंडनीय गुन्हा असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. या याचिकेवर पुढील सुनावणी 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
Breaking News: बलात्कार पीडितेचे नाव उघड करणाऱ्या विधी व्यवसायिक संस्थेला उच्च न्यायालयाने ठोठावला 5000 चा दंड - महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
21:09 December 24
बलात्कार पीडितेचे नाव उघड करणाऱ्या विधी व्यवसायिक संस्थेला उच्च न्यायालयाने ठोठावला 5000 चा दंड
19:58 December 24
लातूरमध्ये सराईत गुन्हेगाराला अटक
लातूर - जिल्ह्यातील एका 25 वर्षीय सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी दिली. तो भाग्यनगरचा रहिवासी असून खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मालमत्तेचे नुकसान, सशस्त्र दरोडा असे गुन्हे त्याचावर दाखल आहेत.
19:34 December 24
भारताला महासत्ता बनवण्यासाठी तरुण पिढी झटत आहे - ओम बिर्ला
पुणे - भारताला महासत्ता बनवण्यासाठी देशातील तरुण खूप मेहनत घेत आहेत, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. भारत ही लोकशाहीची जननी आहे, असे ते म्हणाले, एमआयटी स्कूल ऑफ डिझाईनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.
18:50 December 24
पुणे शहरात गोवरचा पहिला मृत्यू
पुणे - शहरात गोवरचा पाहिला मृत्यू समोर आला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा मुलगा उपचार घेत होता. पुण्यात गोवरचे 11 बाधित रुग्ण नोंद केले आहेत. तर तब्बल 344 संशयीत रुग्ण आहेत.
18:32 December 24
दिल्ली आणि मुंबईतील सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये आढळला आरएनए व्हायरस - मांडवीय
नवी दिल्ली - Covid19 चा प्रसार नियंत्रित करण्यासाठी आम्ही अलर्ट मोडवर काम करत आहोत, असे केंद्रिय आरोग्य मंत्री मांडवीय यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी दिल्ली आणि मुंबईतील सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये आरएनए व्हायरस आढळला असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच लोकांना मास्क घालण्याचे आवाहन करा, गर्दीच्या ठिकाणे टाळा आणि कोविडचे योग्य वर्तन करा, असे निर्देशही त्यांनी सर्व संबंधितांना दिले आहेत.
18:29 December 24
टीव्ही अभिनेत्री तनिषा शर्माची आत्महत्या
पालघर - टीव्ही अभिनेत्री तनिषा शर्माने एका टीव्ही मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. तिला रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. वालीव पोलिसांनी ही माहिती दिली.
17:47 December 24
औंढा नागनाथ मंदिर प्रशासनाचे लोकांना मास्क घालण्याचे आवाहन
हिंगोली - देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानल्या जाणार्या महाराष्ट्रातील हिंगोली येथील औंढा नागनाथ मंदिराच्या अधिकाऱ्यांनी कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होण्याच्या भीतीने लोकांना मास्क वापरण्याची विनंती केली आहे.
17:44 December 24
कळवा खाडीत सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
ठाणे - कळवा खाडीत शनिवारी दुपारी पन्नाशीच्या दरम्यान असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला, पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. खारेगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला, असे अविनाश सावंत यांनी सांगितले. स्थानिक पोलीस तपास करत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
17:40 December 24
ठाण्यात अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
ठाणे - महाराष्ट्रातील ठाणे शहरात एका मुलीची तस्करी आणि वेश्याव्यवसायासाठी जबरदस्ती केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. मुंब्रा पोलिसांनी शुक्रवारी भारतीय दंड संहिता, लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायदा आणि अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
17:38 December 24
ठाण्यात 27.5 लाख रुपयांच्या अमली पदार्थांसह तीन नायजेरियन अटकेत
ठाणे - शहरात 27.5 लाख रुपये किमतीचे कोकेन आणि मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी तीन नायजेरियन नागरिकांना शनिवारी अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. एका गुप्त माहितीच्या आधारे वागळे इस्टेट पोलिसांच्या क्राईम युनिट-5 ने सापळा रचून पहाटे 1 च्या सुमारास एका मॉलजवळ या तिघांना अटक केली, असे वरिष्ठ निरीक्षक विकास घोडके यांनी सांगितले.
17:34 December 24
पालघरमध्ये मूकबधिर व्यक्तीची हत्याप्रकरणी एकाला अटक
पालघर - मूकबधिर व्यक्तीची हत्या प्रकरणी वालीव भागात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली. मूळ उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील सुनील तिवारी (३४) यांचा मृतदेह २० डिसेंबरच्या संध्याकाळी सापडला होता.
17:19 December 24
एक भारतीय म्हणून भारत जोडो यात्रेत सहभागी झालो - कमल हासन
दिल्ली - भारत जोडो यात्रेतील सहभागाबद्दल अभिनेता कमल हासन यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, बरेच लोक मला विचारतात की मी इथे का आलो आहे. मी एक भारतीय म्हणून इथे आलो आहे. माझे वडील काँग्रेसी होते. माझ्याकडे विविध विचारधारा आहेत आणि माझा स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला आहे, परंतु जेव्हा देशाचा विचार पुढे येतो तेव्हा सर्व राजकीय भूमिका बाजूला कराव्या लागतात. असे कमल हासन म्हणाले.
16:00 December 24
कायद्याच्या विद्यार्थीनीवर वरिष्ठ वकिलाचा बलात्काराचा प्रयत्न
पाटणा - उच्च न्यायालयाचे वकील निरंजन कुमार यांनी त्यांच्याच कार्यालयात इंटर्न म्हणून काम करणाऱ्या २२ वर्षीय कायद्याच्या विद्यार्थ्यासोबत बलात्काराचा प्रयत्न केला. त्यांच्यावर कलम ३४१, ३४२,३५४, ३५४(ए) आणि ५०४ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वकील निरंजन कुमार यांना अटक करण्यात आली आहे असे बिहार पोलिसांनी सांगितले.
15:57 December 24
राज्यात कोविडचे केवळ 132 रुग्ण - आरोग्य मंत्री
पुणे - राज्यातून कोरोना जवळपास हद्दपार झाला आहे. राज्यात कोविडचे केवळ 132 रुग्ण आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले.
15:32 December 24
कोचर दाम्पत्याला सीबीआय कोठडी
मुंबई - ICICI बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर आणि माजी सीईओ दीपक कोचर यांना मुंबई सीबीआय कोर्टात हजर करण्यात आले. 300 कोटी रुपयांच्या व्हिडीओकॉन कर्ज घोटाळा प्रकरणात दोघांना अटक झाली आहे. याआधी दोघांनाही ईडीने अटक केली होती. मात्र गेल्यावर्षी त्यांची जामिनावर सुटका झाली. आज कोर्टात या दोघांना सोमवार पर्यंत 3 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.
15:16 December 24
ठाण्यात टिशू पेपरच्या गोदामाला भीषण आग
ठाणे - भिवंडी तालुक्यातील दापोडा गावातील कृष्णा कॉम्प्लेक्स गोदाम संकुलात टिशू पेपरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
14:18 December 24
इशा अंबानी जुळ्या मुलांसह मुंबईत दाखल
मुंबई - इशा अंबानी तिच्या नवजात जुळ्या मुलांसह तिच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचली आहे. मुकेश आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा आणि त्यांचे पती आनंद पिरामल यांना 19 नोव्हेंबर रोजी जुळ्या मुलांचा जन्म झाला.
14:04 December 24
ध्यानधारणेसाठी केजरीवाल येणार नागपुरात
नागपूर - दिल्लीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल फेत्री येथील ध्यान केंद्रात 10 दिवसांसाठी येणार आहेत. अरविंद केजरीवाल 10 दिवसांच्या विपश्यना अभ्यासक्रमासाठी नागपुरात येत आहेत. कोणत्याही माध्यमांना त्यांना भेटता येणार नाही.
13:57 December 24
साताऱ्यात फर्निचर दुकानाला आग, लाखोंचे नुकसान
सातारा - शहरातील बुधवार पेठेत स्टार एंटरप्राइजेस या फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागून दुकानातील फर्निचरचे साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
13:15 December 24
चंदा कोचर दीपक कोचर यांची CBI विशेष कोर्टात सुनावणी सुरू
मुंबई - ICICI बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना CBI विशेष कोर्टात हजर केले आहे. वरिष्ठ वकील अमित देसाई कोचर यांच्या वतीने युक्तिवाद करणार आहेत. तर ऐ. लिंबोसीन हे CBI कडून बाजू मांडणार आहेत.
12:57 December 24
केंद्रसरकारमार्फत देवरुखच्या डी-कॅडमध्ये विनामूल्य हस्तकला प्रशिक्षण
देवरुख (रत्नागिरी) - येथील डी-कॅड चित्रकला महाविद्यालयामध्ये दि. 4 व 5 जानेवारी 2023 रोजी भारत सरकार मार्फत हस्तकला या विषयी प्रशिक्षण होणार आहे. त्याची वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 असणार आहे. यामध्ये पाच ते सहा प्रकारची हस्तकला शिकविली जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी 15 वर्षावरील मुला मुलींना सहभाग घेता येणार आहे. तसेच हे प्रशिक्षण विनामूल्य असणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य मराठे यांनी ही माहिती दिली.
12:54 December 24
मुंबईत पंधरा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार
मुंबई - लोअर परळ परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. पंधरा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. त्यातील एका आरोपीसोबत तरुणीचे होते प्रेमसंबंध होते. या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
12:24 December 24
कोचर दाम्पत्याला आज न्यायालयात हजर करणार
मुंबई - ICICI बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर आणि माजी सीईओ दीपक कोचर यांना मुंबई सीबीआय कोर्टात हजर करणार आहेत. आज सीबीआयकडून दोघांनाही कोर्टात हजर केले जाणार आहे. 300 करोड रुपयांच्या व्हिडीओकॉन कर्ज घोटाळा प्रकरणात झालीय दोघांनाही अटक केली आहे. याआधी दोघांनाही ईडीने अटक केली होती. मात्र गेल्यावर्षी त्यांची जामिनावर सुटका झाली. याच प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात आता दोघांना अटक झाली आहे.
12:09 December 24
आरोग्य स्थितीबाबत माहिती अर्ज भरणे चीन-जपानहून येणाऱ्यांना बंधनकारक
नवी दिल्ली - कोविड प्रसार रोखण्यासाठी खबरदारी म्हणून चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी एक अर्ज भरुन द्यावा लागेल. त्यामध्ये त्यानी त्यांची सध्याची आरोग्य स्थिती विषद करायची आहे. हा अर्ज भरुन देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
11:38 December 24
Breaking News: भारतात गेल्या 24 तासांत 201 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
नवी दिल्ली - सध्या पुन्हा एकदा कोरोनाची लाट आल्याची परिस्थित निर्माण झाली आहे. देशभरात सर्व नियम लागू केले जात आहेत. दरम्यान, भारतात गेल्या 24 तासांत 201 नवीन कोविड-19 संसर्गाची नोंद झाली आहे.
08:55 December 24
Breaking News: भाजप आमदार जयकुमार गोरे अपघातात जखमी, कार बानगंगा नदीच्या पुलावरून कोसळली
सातारा - माण-खटावचे आमदार तथा भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या गाडीला फलटण तालुक्यात अपघात झाला आहे. गाडी ५० फूट नदीत कोसळली असून अपघातात आमदार गोरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे.
06:27 December 24
Breaking News : वाहन पलटी होऊन दरीत कोसळल्याने आठ जणांचा मृत्यू
इडुक्की (केरळ) - सबरीमाला यात्रेकरूंना घेऊन जाणारे वाहन पलटी होऊन दरीत कोसळल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २३ डिसेंबर)रोजी केरळच्या इडुक्की येथील कुमाली हेअरपिन बेंड येथे रात्री अकराच्या सुमारास घडली आहे. यामध्ये तामिळनाडूतील यात्रेकरू होते.