ETV Bharat / state

मुंबई : हनीट्रॅपची धमकी! प्रेयसीची गळा दाबून हत्या - girlfriend murder by boyfriend mumbai

आरोपी आणि मृत मुलीची एका वर्षापूर्वी फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आरोपी हा वांद्रे परिसरातील एका हॉटेलमध्ये कामाला होता. तर मृत मुलगी घरकाम करायची.

ACCUSED
आरोपी
author img

By

Published : Jun 1, 2021, 9:50 AM IST

मुंबई - वांद्रे परिसरात हानी ट्रॅपमध्ये अडकवण्याची धमकी देणाऱ्या प्रेयसीचाच गळा आवळून हत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. बिपीन विनोद कंडुलना असे या आरोपीचे नाव आहे. तर इशिता कुंजुर असे या मृत मुलीचे नाव आहे.

शारिरीक संबंधांनंतर मुलीकडून दीड लाखाची मागणी -

आरोपी आणि मृत मुलीची एका वर्षापूर्वी फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आरोपी हा वांद्रे परिसरातील एका हॉटेलमध्ये कामाला होता. तर मृत मुलगी घरकाम करायची. रविवारी रात्री पीडित मुलगी आरोपीच्या लाल मिठी परिसरातील घरी आली होती. दोघांमध्ये शारिरीक संबध झाल्यानंतर पीडित मुलगी आरोपीकडे दीड लाख रुपयांची मागणी करू लागली.

हेही वाचा - ऊसतोड कामगाराच्या डॉक्टर मुलाचा कोरोनाने मृत्यू; राहुलचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण

गळा दाबून हत्या -

पैसे न दिल्यास आरोपीला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊ लागली. त्यानंतर आरोपीने तिची समजूत काढून वांद्रे रिक्लेमेशन परिसरात फिरण्यासाठी गेले. त्यावेळी वांद्रे पश्चिम येथील सेंट फ्रेंसिस्कोच्या गल्लीत पुन्हा पीडितेने पैसे मागण्यास सुरुवात केली. आरोपीने वारंवार समजावण्याचा प्रयत्न करूनही मृत मुलीने स्वत:चे कपडे फाडून घेत आरडा ओरडा करण्यास सुरूवात केली. यानंतर आरोपीने तिचा गळा आवळून हत्या केली, अशी माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

आरोपीला 12 तासात अटक -

मृतदेह मिळाल्यानंतर वांद्रे पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपीची आणि मृत मुलीची कोणतीही माहिती नसताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुधीर जाधव यांच्या पथकाने शर्तीचे प्रयत्न करून आरोपीला 12 तासात अटक केली. आरोपी आणि मृत महिला हे मूळचे झारखंडचे रहिवाशी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - जमिनीच्या वादातून तुफान हाणामारी; 20 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.