ETV Bharat / state

Boyfriend Killed Girlfriend : गर्लफ्रेंड करत होती लग्नाची मागणी, प्रियकराने गळा आवळून केली हत्या, वाचा धक्कादायक बातमी - प्रियकराने गळा आवळून ठार मारले

मृत उर्वशी 7 महिन्यांपूर्वी आरोपी रियाझ खानच्या संपर्कात आली. त्यानंतर ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मात्र ती त्याच्याकडे सारखी लग्नाची मागणी करत असल्याने रियाझ खानने तिला गळा आवळून ठार मारले. (boyfriend killed girlfriend when ask for marriage) (boyfriend killed girlfriend in Navi Mumbai).

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 21, 2022, 11:05 PM IST

नवी मुंबई : संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या श्रद्धा वालकर या तरुणीची केस ताजी असतानाच पनवेलमधल्या या हत्याकांडाने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रद्धा वालकर खुनाशी अगदी तंतोतंत साधर्म्य साधणाऱ्या या घटनेत लग्नाचा तगादा लावणाऱ्या आपल्या प्रेयसीला प्रियकराने गळा आवळून ठार मारले. (boyfriend killed girlfriend when ask for marriage) (boyfriend killed girlfriend in Navi Mumbai).

विशिष्ट ब्रॅन्डच्या चप्पलवरून शोध घेतला : पनवेल तालुक्यातील धामणी गावाजवळील पुलाखाली 14 डिसेंबरला एका 25 ते 30 वर्षे वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळला. या महिलेला अज्ञात इसमाने ओढणीने व हाताने गळा दाबून ठार मारल्याचे प्राथमिक स्वरुपात समोर आले होते. गुन्हे शाखा कक्ष 2 च्या पनवेल पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत महिलेच्या अंगावरील वस्तूंचे बारकाईने निरीक्षण केले. गुन्हयाच्या घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे नवी मुंबई, मुंबई, ठाणे परिसरातील हरवलेल्या महिलांचा शोध घेतला. महिलेने घातलेल्या एका विशिष्ट ब्रॅन्डच्या चप्पलवरून तिचा शोध घेतला असता मृत महिलेचे नाव उर्वशी वैष्णव असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

आरोपीने केला गुन्हा कबूल : उर्वशी वैष्णव ही 13 डिसेंबर रोजी कोपरखैरणे परिसरातून बेपत्ता झाली होती. ती बेपत्ता झाल्यानंतर 2 दिवसातच तिचा मित्र रियाझ खानही बेपत्ता झाला होता. त्यामुळे उर्वशीच्या कुटुंबीयांनी रियाझ खान यानेच तिचा खून केल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासात गुप्त बातमिदारामार्फत संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत फरार आरोपी जिम ट्रेनर रियाज समद खान, वय 36 वर्षे तसेच कुरियर डिलिव्हरी बॉय इम्रान इस्माईल शेख, वय २८ वर्षे या दोघांना अटक केली. पोलिसांच्या चौकशीत रियाझ खानने गुन्हा कबूल केला.

दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते : उर्वशी गेल्या 6 ते 7 वर्षांपासून नवी मुंबई कोपरखैरणेतील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होती. येथे ती 7 महिन्यांपूर्वी आरोपी रियाझ खानच्या संपर्कात आली. हळूहळू त्यांच्यात मैत्री वाढली आणि ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. 13 डिसेंबर रोजी रियाझ खान नेहमीप्रमाणे तिला हॉटेलमध्ये सोडण्यासाठी गेला, मात्र ती परतली नाही. दुपारी रियाझ खान तिची गाडी घेऊन घरी आला. रियाझ खानने दिलेल्या कबुली जबाबाप्रमाणे उर्वशी ही त्याची प्रेमिका होती. ती त्याच्यासोबत 7 महिन्यांपासून लिव्ह-इन- ररिलेशनमध्ये राहत होती. तिने लग्नाचा तगादा लावल्यांनंतर रियाझ खान लग्नासाठी टाळाटाळ करू लागला. मात्र तिचा हट्ट वाढतच गेल्याने त्याने तिला जीवे मारण्याचा प्लॅन बनवला. यात त्याने त्याचा सहकारी इम्रान इस्माईल शेख, याची मदत घेतली. तिला ती काम करत असलेल्या हॉटेलवर सोडायच्या बहाण्याने गाडीत बसवत रियाझ खानने उर्वशीच्या लाल रंगाच्या बलेनो कारमध्ये तीचा गळा आवळून खून केला. दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह पनवेल तालुक्यातील धामणी गावाजवळील गाढी नदीच्या पुलावरून पाण्यात फेकून दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.