मुंबई : राज्यामधील विद्यार्थ्यांच्या शालेय दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांच्याच आतमध्ये वयांची पाने जोडली जातील असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर करण्यात आले होते. ऑगस्ट 2022 मध्येच शालेय शिक्षण मंत्र्यांनी याबाबत वक्तव केले होते. जेणेकरून दप्तराचे ओझे कमी होईल आणि विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील भार कमी होईल.
शिक्षण तज्ञ काय म्हणतात : या निर्णयानंतर विरोधी पक्ष, शिक्षण क्षेत्रातील जाणकार तसेच पालक, शिक्षण तज्ञ यांनी याबाबत भीती व्यक्त केली आहे. पुस्तकांना वह्यांची पाने जोडल्यामुळे भरमसाठ किमती वाढतील, व्यापारी आणि उत्पादकांना याचा फायदा सहज होईल. मात्र सामान्य आणि गरीब पालक हे मात्र भरडले जातील. कागदाच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकांच्या किमतीवर त्याचा परिणाम होणार आहे. आणि म्हणून पाठ्यपुस्तकांच्या किमतीमध्ये वाढ होईल. तसेच पुढे हे देखील नमूद केले की, समग्र शिक्षा योजनेअंतर्गत आणि खुल्या बाजारात जो पुस्तकांचा पुरवठा होतो तो पाठ्यपुस्तक मंडळाच्या मूल्यांकन सूत्रानुसार होतो. आता त्यात नव्याने मूल्यांकन करून पुस्तकांच्या किमती निश्चित करण्यात येतील. पाठ्यपुस्तके चार भागांमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील.
मानसिक ओझ्याचे काय : यासंदर्भात शिक्षण तज्ञ अरविंद वैद्य यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, कोणतेही शासन असे वरवरचे निर्णय घेत असतात. याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण आणि मानसिक ओझे आणि शाळेमधील दहशत कमी होईल का ? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. मूठभर शिक्षक आणि कर्मचारी मुलांशी प्रेमाने समजून घेऊन वागतात. पण बहुतांशी तसे वागत नाही. याला आपल्या व्यवस्थेतील अनेक महत्त्वाची कारणे आहेत. त्याकडे शासन लक्ष देणार आहे का? सर्वात मूलभूत प्रश्न परीक्षा पद्धती बदलणार आहे का? हे वरवरचे उपाय करून फार काही साध्य होणार नाही. पालकांच्या माथी तुम्ही वाढीव किमतीचा बोजा टाकत आहात ते काही योग्य नाही.
हेही वाचा : BJP MLA Son Caught Taking Bribe : भाजप आमदाराच्या मुलाला लाच घेताना रंगेहाथ पकडले, घरातून 6 कोटी रुपये जप्त