ETV Bharat / state

Bus Arrangement For PM Modi Meeting : पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी तब्बल २ हजार बसची होती बुकिंग - मुंबईतील विकासकामांचे भूमिपूज

मुंबईमधील विविध विकास कामांचे आज भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या सभेला कार्यकर्ते तसेच लोकांची ने-आण करण्यासाठी बेस्ट, एसटी आणि खासगी अशा एकूण २ हजार बसेस वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याचप्रमाणे मुंबई पालिकेच्या गाड्यांचाही वापर करण्यात आला आहे.

Bus Arrangement For PM Modi Meeting
मुंबई बस
author img

By

Published : Jan 19, 2023, 10:53 PM IST

मुंबई : मुंबईत आज बीकेसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो २ ए, मेट्रो ७ या दोन लाईनचे लोकार्पण करण्यात आले. पालिकेच्या एसटीपी प्लांट, ४०० किलोमीटरचे काँक्रिट रस्ते, ३ रुग्णालये, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे सुशोभीकरण आणि पुनर्विकास याच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम बीकेसी बांद्रा येथील एमएमआरडीए ग्राऊंडवर झाला. याठिकाणी दीड लाख लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

२ हजार बसेस : सभेला मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपाचे कार्यकर्ते आले होते. या सभेला कार्यकर्त्यांना आणण्यासाठी राजकीय पक्ष आणि त्यांच्या पदाधिकारी यांनी खासगी १२००, बेस्टच्या ५०० तसेच एसटीच्या ३५० अशा एकूण २०५० बसेसचा वापरल्या आहेत. बेस्टच्या एका बससाठी ६५ रुपये प्रती किलोमिटर दर आकारला जातो. अर्ध्या दिवसासाठी बस भाड्यावर घेतल्यास ६ हजार तर पूर्ण दिवसासाठी १२ हजार रुपये भाडे आकारले जाते. तर खासगी बस भाड्यावर घ्यायची झाल्यास एका किलोमिटरला ३५ ते ५० रुपये भाडे आकारले जाते.

पालिकेच्या गाड्यांचाही वापर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. याचवेळी १ लाख १५ हजार फेरीवाल्यांना पीएम स्वनिधी फंडातून कर्ज देण्यात आले आहे. यासाठी फेरीवाल्यांना पालिकेच्या कारवाई करणाऱ्या वाहनातून सभेच्या ठिकाणी नेण्यात आले. ज्या वाहनांमधून पालिका फेरीवाल्यांवर कारवाई करते त्याच वाहनातून आज फेरीवाल्यांना सभेच्या ठिकाणी पोहचवण्याची जबाबदारी पालिकेला पार पाडावी लागली.

सभेत काय म्हणाले मोदी ? : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, दुकानदारांपासून मोठ्या व्यावसायिकांपर्यंत मुंबईत राहणे सर्वांना सोयीचे होणार आहे.धारावी पुनर्विकास, जुन्या चाळींचा विकास सर्व आता ट्रॅक वर येत आहे.शिंदे आणि देवेंद्र यांना यासाठी शुभेच्छा देत मुंबईच्या विकासासाठी बजेटची कमी पडणार नाही असे आश्वासनसुद्धा मोदी यांनी दिले. परंतु तो पैसा योग्य ठिकाणी वापरला गेला पाहिजे हे सांगायला ते विसरले नाहीत. कारण महानगरपालिकेत इतकी वर्ष सत्ता असताना शिवसेनेच्या काळात जो भ्रष्टाचार झाला त्याची पोलखोल सध्या भाजपकडून केली जात आहे. त्यासाठी स्थानिक सत्ता महत्त्वाची असते. विकासाचे काम रोखण्याची प्रवृत्ती असेल तर मुंबईचे भविष्य कसे उज्वल होईल, असे सांगत त्यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेवर टोला लगावला.

हेही वाचा : PM Modi In Mumbai : डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा अभूतपूर्व विकास -पंतप्रधान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.