मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मातोश्री ते मंत्रालयापर्यंतचा राजकीय प्रवास 'मातोश्री ते मंत्रालय' या पुस्तकात मांडण्यात आला आहे. आज (मंगळवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. शिवसेनेच्या आमदार व प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांची या पुस्तकामागील संकल्पना असून लेखन लेखक मनोज आवळे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः एक उत्कृष्ट छायाचित्रकार आहेत. म्हणूनच कलासक्त प्रवास मातोश्री ते मंत्रालय हे पुस्तकाचे नाव ठेवण्यात आल्याचे कायंदे यांनी सांगितले. शिवसेनेत नव्याने येणारे युवा सैनिक, महिला यांना उद्धव ठाकरे यांचा जीवनप्रवास कसा आहे? याबाबत हे पुस्तक मार्गदर्शनपर ठरेल असेही त्या म्हणाल्या.
कोरेगाव भीमा दंगल घडली. त्या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. दोषी कोणीही असो त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि तो समोर आलाच पाहिजे असे कायंदे यांनी म्हटले आहे.