ETV Bharat / state

Bombay High Court: उशीरा गुन्हा दाखल झाला, म्हणजे घटना असत्य ठरत नाही; अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला न्यायालयाकडून 10 वर्षांची शिक्षा

एका आरोपीने तेरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बलात्कार केला. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाने त्याला पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून दहा वर्षाची तुरुंगवास शिक्षा ठोठावली आहे. पीडित मुलीचे पुनर्वसन शासनाने करायला हवे, असे देखील न्यायालयाने नमूद केले आहे.

Bombay Court
मुलीवर बलात्कार
author img

By

Published : May 17, 2023, 9:35 AM IST

मुंबई : दिवसेंदिवस बलात्काराच्या घटना वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी आरोपीला कठोर शिक्षा हा पर्याय आहे. मुंबईत अशीच एक घटना घडली होती. 32 वर्षाच्या आरोपीने 13 वर्षाच्या मुलीवर अनेक वेळा बलात्कार केला होता. आरोपी हा तीन मुलींचा बाप आहे. पीडिता एकटी असल्याचे पाहून तिला एका निवांत जागी नेऊन त्याने अनेकदा बलात्कार केला. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याच्यावर पोस्को कायद्यांतर्गत खटला दाखल केला.

आरोपीची बाजू खोडून काढली : आरोपी हा एका तांत्रिक कार्यशाळेमध्ये कामाला होता. जेव्हा तो त्या ठिकाणी काम करायचा त्याच्या जवळच तेरा वर्षाची मुलगी राहत होती. ती एकटी असल्याचा फायदा घेवून त्याने तिला तोंड दाबून त्या मुलीला वर्कशॉपमध्ये नेले. तिथे पुन्हा पुन्हा बलात्कार केला. आरोपीच्या वतीने वकिलांनी दावा केला होता की, त्याच्याकडून चूक झालेली आहे. एफआयआर तर उशिरा दाखल झालेला आहे, ही बाजू ऐकून न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आरोपीची बाजू खोडून काढली. म्हटले की, अनेकदा बलात्कार केला. एकट्या मुलीला निर्जन जागी नेऊन बलात्कार करणे आणि उशिरा गुन्हा नोंदवणे, याचा अर्थ गुन्हा केला. ही बाब असत्य ठरत नाही. सत्य ठरते ते म्हणजे गुन्हा घडलेला आहे. त्यामुळेच याला कठोर शिक्षा झाली पाहिजे.

आरोपीच्या विरोधात महत्त्वाची साक्ष : न्यायालयाने हे देखील नमूद केले की, कोवळ्या वयामध्ये मुलीवर अनेकदा अत्याचार आरोपीने केला होता. तिच्या शारीरिक आणि मानसिक वैद्यकीय बाबीची पूर्तता करणे शासनाचे कर्तव्य आहे. तसेच त्या पीडित मुलीला शासनाने नुकसान भरपाई देणे आणि कल्याणकारी तरतूदीमधून तिच्यासाठी तिचे आयुष्य उभारणीसाठी मदत करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. ज्या तेरा वर्षाच्या मुलीवर हा बलात्कार अनेकदा केला गेला, तिच्याबाबत साक्ष देणारी मुलगी देखील बालिकाच आहे. जवळजवळ तिच्याच वयाची आहे. तिने न्यायालयात 28 एप्रिल 2019 रोजी आरोपीच्या विरोधात महत्त्वाची साक्ष दिली होती. त्यामुळे पीडित मुलीला न्याय मिळण्यात तिची साक्ष महत्त्वाची ठरली.

हेही वाचा :

  1. Goat Smuggling Case: बकरे गुजरातच्या नावाने जाणार होते, दुबईला कस्टमने पकडले; वाद मुंबई उच्च न्यायालयात
  2. Pradeep Kurulkar Case : डीआरडीओ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांनी माहिती पाकिस्तानला दिली का? काय म्हणाले सरकारी वकील...
  3. Challenge To Surrogacy Rule Amendment: केंद्राच्या सरोगसीबाबत नियमातील दुरुस्तीला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.