मुंबई : मुंबईमध्ये चार चाकी वाहन चालवणाऱ्या एका व्यावसायिक आपल्या कुटुंबासमवेत जात असतानाच त्याच्याकडून एका महिलेला धडक बसली. धडक बसल्यानंतर त्या महिलेला दुखापत झाली. परिणामी त्या महिलेला दवाखान्यात दाखल व्हावे लागले,. मात्र तिने यानंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. तिला काही एक नुकसान भरपाई तातडीने मिळावी. अशी तिची मागणी होती मात्र यामध्ये वाहन मालकाने ते देण्यास नकार दिला होता.
वैद्यकीय खर्च : मुंबईमध्ये काही दिवसापूर्वी रस्त्याने चालत असताना मागवून येणाऱ्या चार चाकी वाहनाने या महिलेला धडक दिली. चार चाकी वाहन चालवणारी व्यक्ती गाडी जोरात चालत होती. मात्र पायी चालणारी महिला नियमानुसार आपल्या मार्गाने डाव्या बाजूने पायी चालत असतानाच चार चाकी चालवणाऱ्या कारच्या चालकाचा ताबा सुटला नियंत्रण गमावले. त्यामुळे या रस्त्याने चालणाऱ्या महिलेला त्या गाडीने धडक दिली. ती महिला जागीच पडली त्यानंतर तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्या महिलेला दवाखान्यामध्ये वैद्यकीय खर्च भरपूर प्रमाणात आला. त्यामुळे तिची मागणी होती की तिला वैद्यकीय खर्च आणि नुकसान भरपाई मिळावी.
आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची : या धडकेमध्ये महिलेचा जीव वाचला. परंतु तिला दुखापत झाली आणि तिची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे तिने चार चाकी वाहन मालकाने एक लाख रुपये देण्याची मागणी केली होती. मात्र वाहन मालक यांनी ते देण्यास नकार दिला होता.या महिलेची बाजू तिच्या वकिलांनी उच्च न्यायालयात मांडली. यामध्ये न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या सदर महिलेच्या आर्थिक स्थितीची माहिती घेत, चार चाकी वाहन चालकाला याबाबत प्रश्न विचारले
पैसे अधिकृत खात्यावर जमा करण्याचे आदेश : या महिलेला तुमच्यामुळे नुकसान झालेले आहे. त्यामुळे त्या महिलेस नुकसान भरपाई पोटी एक लाख रुपये द्यावे. तसेच त्या महिलेला देखील या संदर्भात नुकसान भरपाई बाबत समाधानी आहात का असे देखील विचारले. त्यानंतर त्या सदर महिलेने होकार दर्शवला. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठाने, वाहन मालकाला एक लाख रुपये एका आठवड्यात त्या महिलेला देण्यात यावे असा आदेश दिला आहे. एक लाख रुपये एका आठवड्यात उक्त महिलेकडे जमा करत असताना तिच्या अधिकृत खात्यावर ते जमा करावे. त्याची पावती देखील न्यायालयामध्ये नंतर दाखवावी. म्हणजे त्या महिलेला हे पैसे मिळाले आहेत याची आम्हाला खात्री होईल. आणि जेणेकरून पुन्हा आपणाकडून या प्रकारची चूक घडणार नाही असे देखील न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी आदेश देताना अधोरेखित केले.