ETV Bharat / state

Actress Rakhi Sawant : अभिनेत्री राखी सावंतला मुंबई उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा; उद्या पुन्हा सुनावणी

शर्लिन चोप्राबाबत आपत्तीजनक वक्तव्ये केल्याच्या आरोप प्रकरणात अभिनेत्री राखी सावंत यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. याप्रकरणी उद्या (24 जानेवारी) सुनावणी होणार आहे.

Actress Rakhi Sawant
राखी सावंत
author img

By

Published : Jan 23, 2023, 11:04 PM IST

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. आज झालेल्या सुनावणी दरम्यान सुनावणी पूर्ण होईपर्यंत कारवाई करू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहे. या अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. राखीवर शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या आठवड्यात आंबोली पोलिसांनी राखीची चौकशी केली होती.

आपत्तीजनक वक्तव्य केल्याचा आरोप : मुंबईतील अंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतले आहे. शर्लिन चोप्राबाबत आपत्तीजनक वक्तव्ये केल्याचा राखीवर आरोप आहे. काही वेळेत अभिनेत्रीला अंधेरी कोर्टात हजर केले जाणार आहे. मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्राने राखी विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आता राखीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शर्लिन चोप्राने स्वत आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

राखी सावंत अटकेत : शर्लिन चोप्राने ट्विट करत अंबोली पोलिसांनी राखीला अटक केल्याचे सांगितले आहे. सोबतच शर्लिन चोप्राने आपल्या एफआरआयबाबत अतिरिक्त माहितीसुद्धा नमूद केली आहे. नुकतेच समोर आलेल्या नव्या माहितीनुसार राखी सावंतने शर्लिन चोप्राबाबत आपत्तीजनक वक्तव्ये केल्याने शर्लिन चोप्राने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ज्यासाठी तिला अंबोली पोलिसांनी अटक केली आहे.

बिग बॉसची बायको ? ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. राखी नुकतीच बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात दिसली होती. बिग बॉसच्या पहिल्या पर्वापासून राखीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे तिला बिग बॉसची बायको असे म्हटलं जातं. सोशल मीडियाच्या माध्यमातून राखी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

काय आहे प्रकरण : शर्लिन चोप्राने राखी सावंतवर आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीची दखल घेत आंबोली पोलिसांनी राखीवर गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून वारंवार प्रयत्न करुनही ती हजर राहत नव्हती. त्यामुळे पोलीस पथकाने तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते. मुंबईच्या सत्र न्यायालयाने राखी सावंतचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता त्यानंतर पुन्हा एकदा तिला ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा : KL Rahul-Athiya Shetty Wedding : सात फेरे घेत राहुल-अथियाने बांधली लग्नगाठ; खंडाळा येथे पार पडला सोहळा, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.