मुंबई Bombay High Court Grant Bail : मायानगरीतील कोपरखैरणे परिसरात एका बालिकेवर बलात्कार करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी 8 फेब्रुवारी 2021 ला आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपीला अटक करण्यात आलं होतं. मात्र पीडित बालिकेनं बाळाला दिलेल्या जन्मानंतर त्याचा जैविक पिता बलात्कार करणारा आरोपी नसल्याचं डीएनए अहवालातून स्पष्ट झालं. त्यामुळं आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी ए सानप यांच्या खंडपीठानं जामीन मंजूर केला. मुंबई उच्च न्यायालयानं 27 डिसेंबरला याबाबतचं आदेशपत्र जारी केलं आहे.
कोपरखैरणेत बालिकेवर केला होता बलात्कार : नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपीनं एका बलिकेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला. त्याला 8 फेब्रुवारी 2021 रोजी अटक करण्यात आली होती. यासंदर्भात ट्रायल कोर्टामध्ये देखील खटला चालला. आरोपीनं बलात्कार केल्यानंतर त्या बलिकेच्या पोटी जन्माला आलेल्या बाळाची डीएनए चाचणी करण्यात आली. मात्र या डीएनए चाचणीच्या अहवालातून आरोपी हा त्या बाळाचा जैविक पिता असल्याचं सिद्ध झालं नाही. त्यामुळं त्याचा जामीन न्यायमूर्ती जी ए सानप यांच्या न्यायालयानं मंजूर केलेला आहे.
पोक्सो अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल : आरोपीच्या वतीनं त्याचं वकील तृप्ती शेट्टी आणि प्रेषिता परब यांनी हा मुद्दा उपस्थित केला. "आरोपीनं एका बालिकेवर 2021 मध्ये कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवी मुंबई या ठिकाणी बलात्कार केला होता. त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम 376, 376 ( 2 ) तसंच 506 आणि आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमानुसार लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता."
ट्रायल कोर्टात नाकारला जामीन : या आरोपीनं ट्रायल कोर्टात जामीन अर्ज केला होता. मात्र ट्रायल कोर्टाला तेव्हा डीएनए अहवाल प्राप्त नव्हता. तसंच आरोपीच्या वतीनं पुन्हा दुसरा गंभीरपणे मुद्दा न्यायालयाच्या समोर उपस्थित केला. जेव्हा ट्रायल कोर्टानं या संदर्भात जामिनाच्या अर्जावर सुनावणी केली, तेव्हा 28 सप्टेंबर 2021 पर्यंत या घटनेच्या संदर्भात आरोपीचा कोणताही डीएनए रिपोर्ट उपलब्ध नव्हता. त्यामुळं तेव्हाच्या परिस्थितीनुसार उपलब्ध पुराव्याच्या आधारे त्याच्या जामीनाला नकार दिला गेला.
पीडितेच्या वकिलांनी जामीन अर्जास केला विरोध : या घटनेतील पीडितेच्या वतीनं वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला." यासंदर्भात आरोपीला जामीन देऊ नये, त्याची संपूर्ण चौकशी होणं अगत्याचं आहे"अशी बाजू लोकेश झाडे यांनी मांडली.
अटी शर्तीच्या आधारे न्यायालयानं केला जामीन मंजूर : दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती जी ए सानप यांनी आपल्या निर्णयात नमूद केले "आरोपीला उपलब्ध पुरावे आणि तथ्याच्या आधारे जामीन मंजूर करता येतो. 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर तसेच कोपरखैरणे नवी मुंबई पोलीस ठाण्यात महिन्यातून एकदा सकाळी 11 ते 2 या काळात हजेरी लावणं. तसंच कोणत्याही पुराव्याची छेडछाड आरोपी करणार नाही. कुठलाही दबाव टाकणार नाही." अशा अटी न्यायालयानं घालून दिल्या आहेत. महत्त्वाची बाब अशी आहे, की आरोपी हा जैविक पिता आहे, ही बाब सोडून तपास अधिकाऱ्यांनी तपास करायला पाहिजे होता. अशा गंभीर घटनेमध्ये खरा गुन्हेगार शोधणं हा महत्त्वाचा भाग आहे. परंतु त्यामध्ये तपास अधिकारी यशस्वी झाले नाहीत. परिणामी आरोपीला जामीन मिळणं भाग आहे."
हेही वाचा :