ETV Bharat / state

Johnson Baby : जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला दिलासा, न्यायालयाने बंदी उठवली - जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी प्रकरण

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या उत्पादन निर्मिती आणि विक्रीवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) उठवली (Johnson Company ban lifted) आहे. आरोग्यासाठी हानीकारक असल्याचा ठपका ठेवल्यामुळे विवादात अडकलेल्या जॉन्सन बेबी टाल्कम पावडर वर एफडीआयने बंदी घातली होती. याप्रकरणातील याचिकेवर न्यायालयाने सुनावणी करत जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला दिलासा दिला आहे. (High Court Decision on Johnson Company)

Bombay High Court
मुंबई उच्च न्यायालय
author img

By

Published : Jan 11, 2023, 4:02 PM IST

मुंबई : आरोग्यासाठी हानीकारक असल्याचा ठपका ठेवल्यामुळे विवादात अडकलेल्या जॉन्सन बेबी टाल्कम पावडरवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बंदी घातली होती. या विरोधात जॉन्सन आणि जॉन्सन कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court ) धाव घेतली होती. आज या याचीकेवर एफडीआयने घातलेली बंदी उच्च न्यायालयाने उठवली (Johnson Company ban lifted) आहे, त्यामुळे जॉन्सन कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. (High Court Decision on Johnson Company)

न्यायालयाने उठवली बंदी : जॉन्सन अँड जॉन्सन या अमेरिकेतल्या कंपनी आपल्या टाल्क-बेस्ड बेबी पावडरच्या उत्पादनामुळे अडचणीत सापडली होती. या पावडरमध्ये असलेल्या काही घटकांमुळे कॅन्सर होत असल्याचे समोर आल्यानंतर जगभरातून कंपनीविरोधात हजारो केसेस दाखल झाल्या होत्या. पण मुंबई कोर्टाने या कंपनीला मोठा दिलासा दिला असून पावडर विक्रीला परवानगी दिली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या टाल्क बेस्ड बेबी पावडरलाअन्न व औषध प्रशासनाने (FDA) बंदी घातली होती. या प्रकरणी आज हायकोर्टामध्ये सुनावणी (High Court Decision on Johnson Baby) झाली. एफडीआयने बंदी घातलेला आदेश उच्च न्यायालयकडून रद्द करण्यात आला आहे.

कंपनीवर अटी लागू : मात्र उच्च न्यायालयाने जॉन्सन अँड जॉन्सन अटी घातल्या आहेत. तपासणी केलेल्या संचातील सर्व माल कंपनीने नष्ट करावा आणि आक्षेप घेण्यात आलेल्या संचातील पावडरचा एकही डब्बा बाजारात विक्रीसाठी जाता कामा नये, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. जॉन्सन जॉन्सन कंपनीने सर्व अटी मान्य केल्या आहेत. त्यामुळे बेबी पावडर विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे.

2013 साली परवाना रद्द : गेल्या वर्षी नॅशनल कमिशन ऑफ प्रोटेक्शन फॉर चाइल्ड राइट्सने डीसीजीआय आणि सीडीएससीओ या दोन्ही संस्थांना समन्स पाठवले होते. जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी शॅम्पू आणि टाल्कम पावडरमध्ये फॉर्माल्डिहाइड आणि अ‍ॅस्बेस्टोस मानवांमध्ये कॅन्सर तयार होण्यासाठी कारणीभूत मानले जाणारे घटक या घटकांची उपस्थिती तपासण्यासाठीच्या चाचणी पद्धतीत एकसमानता का नाही याबाबत या दोन्ही संस्थांनी हजर राहून स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून भारतात कंपनीच्या या उत्पादनांविरोधात कारवाई करण्यात येत होती. 2013 साली महाराष्ट्र ड्रग रेग्युलेटरने कंपनीचं लायसन्स रद्द केले होते.

त्वचेचा कॅन्सरचा आरोप : कंपनीच्या पावडर बनवणाऱ्या एका कारखान्यात इथिलिन ऑक्साइडचा वापर कॅन्सरला कारणीभूत ठरणारे केमिकल करण्यात येत असल्याचं स्पष्ट झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर 2018 मध्ये इंडियन ड्रग रेग्युलेटरने सदोष हिप इम्प्लांट विकल्याबद्दल रुग्णांना भरपाई देण्याचे आदेश कंपनीला दिले होते. 2019 च्या फेब्रुवारीमध्ये जॉन्सन बेबी शाम्पूच्या नमुन्यांची चाचणी केली असता त्यात फॉर्माल्डिहाइड हा घटक आढळून आला. मात्र नंतर गुजरातच्या नियामक संस्थेने या उत्पादनाला हिरवा कंदील दाखवला होता. गेल्या वर्षी जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या पाच सनस्क्रीन प्रॉडक्ट्सचे सर्व लॉट्स परत बोलावले होते. या सनस्क्रीनमध्ये बेंझीन या घटकाची मात्रा आढळली होती. बेंझीन वारंवार संपर्कात आल्याने त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो. यामुळे कंपनीने स्वस्तात ही उत्पादने परत मागवली होती, अशी माहिती जॉन्सन अँड जॉन्सनकडून देण्यात आली.

काय आहे प्रकरण ? : जॉन्सन बेबी टाल्कम पावडर या प्रसिद्ध उत्पादनात निर्माण झालेल्या जीवाणूंच्या प्रचंड वाढीला नियंत्रित करण्यासाठी केलेली प्रक्रिया ही आरोग्यासाठी हानिकारक ठरत असल्याने एफडीएने कंपनीचा परवाना 15 सप्टेंबर 2022 पासून कंपनीचा परवाना रद्द केला. त्या आदेशाला एफडीएच्या मंत्र्यांसमोर दिलेले आव्हान फेटाळण्यामुळे अखेर जॉन्सन कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली. मागील सुनावणीवेळी कंपनीच्या मुलुंड येथील प्रकल्पातून बेबी पावडरचे तीन दिवसांत नमुने घेऊन नव्याने चाचणीसाठी पाठवा असे आदेश न्यायालयाने राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले होते. त्यावर सरकारने तीन सीलबंद अहवाल सादर करत दोन सरकारी प्रयोगशाळांच्या अहवालानुसार बेबी पावडर प्रथमदर्शनी वापरण्यास सुरक्षित असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.