मुंबई: अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर बॉलिवूड एनसीबीच्या रडार वर होते. यात अभिनेत्री भारती सिंग, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अशी अनेक मोठी मोठी नावे ड्रग्ज प्रकरणात समोर आली. यात काही कलाकारांना काही काळ जेल मध्ये देखील राहावे लागले होते.
मुंबई पोलिसांनी 1 कोटी 30 लाखांचे ड्रग्ज जप्त
होळीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यात जास्त सेलिब्रेशन पार्ट्या कलाकारांच्या होत असतात. यात अमली पदार्थांचं सर्रास सेवन केले जाते. त्यातच गुरुवारी मुंबई पोलिसांनी बिहार मधून आलेल्या दोन जणांकडून तब्बल एक कोटी तीस लाखांचे चरस जप्त केले. बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ड्रग्ज पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ही तस्करी होणार असल्याचा पोलिसांना संशय होता.
कलाकारांनी घेतला धसका, सेलिब्रेशन घरीच
एनसीबी व मुंबई पोलिसांच्या याच कारवायांचा धसका घेऊन बॉलिवूडच्या कलाकारांचे यंदाचे होळी सेलिब्रेशन घरीच होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात कॅटरिना कैफ, विकी कौशल, शिल्पा शेट्टी यांच्यासह अनेक विवादीत कलाकारांची होळी घरीच साजरी केली.
हेही वाचा : Holi 2022 : लग्नानंतरची पहिली होळी साजरी करणारी बॉलिवूड जोडपी