ETV Bharat / state

अमली पदार्थांच्या संदर्भात बॉलिवूडच्या 'डी' नावाने सुरुवात असलेल्या अभिनेत्रीचे नाव आले समोर? - ncb investigating sushant singh case

अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यूनंतर अमली पदार्थाचे काही कनेक्शन आहे का यादृष्टीने तपास केला जात आहे. या अमली पदार्थांच्या संदर्भात आता एक व्हॉट्सअप चॅटमध्ये बॉलिवूडमधील 'डी' नावाच्या अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे.

sushant singh rajput death case
सुशांतसिंह मृत्यू प्रकरण
author img

By

Published : Sep 22, 2020, 3:22 AM IST

मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डकडून (एनसीबी) तपास केला जात आहे. या तपासात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. एनसीबीकडून सोमवारी सुशांतसिंह याची माजी मॅनेजर जया शहा हिची चौकशी केली असता एनसीबीला आणखी काही गोष्टी कळल्या आहेत. सध्या एका व्हॉट्सअ‌ॅप चॅट समोर आले आहे. हे व्हॉट्सअ‌ॅप चॅट बॉलिवूडमधील आघाडीच्या काही अभिनेत्रींच्या मधील असल्याचे समोर येत आहे.

28 ऑक्टोबर 2017 मधील हे व्हॉट्सअ‌ॅप चॅट आहे. यात चॅटमध्ये 'डी' नावाची व्यक्ती ही 'के' नावाच्या व्यक्तीला अमली पदार्थांच्या बाबतीत विचारणा करीत असल्याचे समोर आले आहे. ही व्हॉट्सअ‌ॅप चॅट पुढीलप्रमाणे -

डी - तुझ्याकडे माल आहे का ?
करिश्मा - आहे पण घरी आहे, मी बांद्रात आहे.
करिश्मा - जर तू म्हणत असशील तर मी अमीतला विचारू शकते..
डी - हा...
डी - प्लिज....
के - अमितकडे आहे, तो घेऊन जातोय...
डी - हैश ना?
डी - वीड नाही
के - हा, हैश...
के - तू कोको ला कधीपर्यंत येत आहेस....
डी - 11:30/12:00
डी - Shal तिकडे कधीपर्यंत आहे?
के - त्याने 11.30 पर्यंत सांगितले आहे. कारण त्याला 12 वाजता दुसरीकडे जायचे आहे.

या चॅटमध्ये दोन्ही व्यक्तींची पूर्ण नाव घेण्यात आलेले नाही. मात्र, डी नावाची व्यक्ती ही आघाडीची अभिनेत्री आहे. के ही तिची मॅनेजर आहे. कोको नावाचे मुंबईतील लोअर परेल परिसरातील प्रसिद्ध हॉटेल आहे. या चॅटमध्ये गांजा व हशीशबद्दल या दोघात विचारणा झाली आहे.

रियाच्या चौकशीत आणखीन खुलासे -

रिया चक्रवर्ती ही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तिच्या चौकशीत काही गोष्टी समोर आल्या आहेत. रियाच्या जवाबानुसार सुशांतचे ड्रग्स घेणे हे गेल्या काही महिन्यात वाढले होते. सुशांतवर मीटू प्रकरणात खोटे आरोप केल्याने त्याच्यावर मानसिक दबाव वाढला होता. यामुळे तो अमली पदार्थ अधिक घेऊ लागला होता. तो एका वेळी 10 ते 12 वेळा गांजा ओढत असे. केदारनाथच्या चित्रीकरणाच्या वेळी त्याचे वजनही वाढले होते, असे रियाने तिच्या जबाबात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.