मुंबई - नसिरुद्दीन शहा, शबाना आझमी, अनिल कपूर, शत्रुघ्न सिन्हा, राकेश बेदी यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांना अभिनयाचे बाळकडू देणारे अॅक्टिंग गुरू रोशन तनेजा यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. गेले अनेक दिवसांपासून ते उपचार घेत होते. राहत्या घरीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडने एक सच्चा अभिनय शिक्षक गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. त्यांच्या पाश्चात पत्नी मिहिका, रोहित आणि राहुल ही दोन मुले, असा परिवार आहे.
1960 च्या दशकात अभिनय निक्की काय असतो, हे माहीत नसलेल्या काळात पुण्यातील एफटीआयआय या संस्थेत अभिनय प्रशिक्षण देण्याची जबाबदारी तनेजा यांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यानंतर अनेक कलाकार त्यानी घडवले. त्यानंतर काही कारणाने एफटीआयआय मधील अभिनय प्रशिक्षण अभ्यासक्रम बंद करण्यात आला. त्यामुळे तनेजा यांनी मुंबईत रोशन तनेजा स्कुलची स्थापना केली आणि आपले अभिनय शिकवण्याच काम पुढे सुरूच ठेवले.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूडमधील अनेकांनी त्यांना ट्विटरद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. शबाना आझमी यांनी लिहिल की, सकाळी सकाळीच एक वाईट बातमी मिळाली माझे एफटीआयआय मधील गुरू रोशन तनेजा यांचे निधन झाले. माझ्या आयुष्यात ज्यांना मी खूप मानले आणि ज्याचे पाय मी अनेकदा धरले अशी व्यक्ती आज निघून गेली आहे. त्यांच्याकडून अभिनय प्रशिक्षण घेतल्याचा मला सार्थ अभिमान आहे.
अभिनेते राकेश बेदी यांनी लिहिलं की, माझे अभिनयातले गुरू रोशन तनेजा यांचे निधन झाले. माझे संपूर्ण करिअर हे फक्त त्यांना समर्पित आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
रोशन तनेजा यांचे पार्थिवावर आज दुपारी 4.30 वाजता सांताक्रूझ स्मशानभूमीत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.