ETV Bharat / state

Bogus Call Center Exposed : मुंबईत बोगस कॉल सेंटरचा खुलासा; 'असे' लुटायचे - Bogus Call Center Exposed

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्राम आदी सोशल मीडियाव्दारे स्वस्तात विमान तिकीटे बुक करण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अनधिकृत कॉल सेंटरवर मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष 8 ने कारवाई केली आहे. याप्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे. मृदुल अशोक जोशी (वय 34) हा या प्रकरणातील मुख्य सुत्रधार आहे.

Bogus Call Center Exposed
अनधिकृत कॉल सेंटरचा खुलासा
author img

By

Published : Aug 12, 2023, 10:13 PM IST

Updated : Aug 12, 2023, 10:53 PM IST

अनधिकृत कॉल सेंटरच्या खुलास्याविषयी माहिती देताना पोलीस अधिकारी

मुंबई: गेल्या चार ते पाच महिन्यांपासून अंधेरी परिसरातील मरोळ येथे एका फ्लॅटमध्ये मृदुल जोशी आणि अभिषेक मृदुल या दोन भावांनी बोगस कॉल सेंटर सुरू केले होते. या कॉल सेंटरच्या माध्यमातून सोशल मीडियावर विमान तिकीटावर भरघोस ऑफर देऊन ठगबाजी केली जात होती. गुन्हे शाखेच्या कक्ष-8 ला या टोळक्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'या' 9 आरोपींना अटक: मुख्य सूत्रधार मृदुल अशोक जोशी (वय 34), फैजान गूलशाद अहमद (वय 25), आशिष विजय शर्मा (वय 26), सलमान सहित मोहम्मद सिद्दिकी (वय 48), देवेंद्र तीर्थ सिंह (वय 32), मोहम्मद उमेध उर्फ गौरव (वय 25), साहिल दर्शन सिंह उर्फ दीपक कुमार (वय 19 ) संतोष रमेशचंद्र कांडपाल (वय 29) आणि श्रीराम मुकुंदकुमार मथीलकथ (वय 44) ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर उपासना अशोक सिंग (वय 35) या आरोपी महिलेला 41 अ प्रमाणे नोटीस देऊन जाऊ देण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, मुख्य आरोपी मृदुल जोशी हा मूळचा दिल्लीचा असून त्याच्या विरोधात जयपूरमध्ये ईडीचा गुन्हा दाखल आहे. मुंबईत व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

अशा रीतीने फसवले जायचे: 10 ऑगस्टला कक्ष-८ चे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. यानुसार अंधेरी पूर्व येथील मरोळ परिसरातील ३०१/ए, मिलल कमर्शिया, हसन पाडा रोड या ठिकाणी विमान प्रवासाकरिता इच्छुक ग्राहकांना, विशेषतः कॅनडा देशामध्ये राहणाऱ्या नागरिकांना फसवले जात होते. तसेच देश-विदेशातील नागरिकांना इंटरनेट, व्हॉट्सअ‍ॅपव्दारे संपर्क साधून आणि फेसबुक, इन्स्टाग्राम, गुगल या सोशल मीडिया माध्यमाव्दारे जाहिरात करून फसवले जात होते. या जाहिरातीस प्रतिसाद देणाऱ्या ग्राहकांना स्वस्तात विमान तिकीट मिळवून देण्याचे आमिष दाखविले जायचे. यानंतर त्यांना तिकीटाची रक्कम हस्तांतरीत करण्यास लावून तसेच त्याकरिता बनावट विमान तिकीटे व बिले पाठविली जायची. रक्कम प्राप्त होताच त्यांच्याशी असलेला संपर्क तोडला जायचा आणि मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जायची.

'हा' मुद्देमाल जप्त: मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने कक्ष-८ मधील अधिकारी आणि अंमलदार यांची पथके तयार करून अंधेरी येथील मरोळ परिसरातील फ्लॅटवर छापा टाकण्यात आला. या दरम्यान घटना स्थळावरून एकूण १२ इसम व १ महिला हे याबाबत कोणताही परवाना न घेता भारतामध्ये अनधिकृत कॉल सेंटर चालवित असल्याचे समोर आले. याबाबत सविस्तर पंचनामा करण्यात आलेला असून आरोपींच्या ताब्यातून एकूण २८ लॅपटॉप, ४० मोबाईल फोन, राऊटर व गुन्ह्याविषयी इतर कागदपत्रे असे एकूण अंदाजे ७ लाख २९ हजार एवढ्या किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

'या' कलमांतर्गत गुन्हा दाखल: याप्रकरणी आरोपी इसमाविरुध्द सहार पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४, १२० (ब) सह कलम ६६ (क), ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये कक्ष-८ मधील अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करून 12 इसमांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता 14 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचप्रमाणे एका महिलेला पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

हेही वाचा:

  1. Mumbai Crime : फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर कारवाई, युनिट 3 ने 11 आरोपींना केली अटक
  2. Bogus Call Center: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई, बोगस कॉल सेंटरवर छापा; 6 जणांना अटक
  3. बजाज फायनान्सच्या नावाखाली चालणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर पोलिसांची छापेमारी

Last Updated : Aug 12, 2023, 10:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.