ETV Bharat / state

Body Bag Scam Case : कोरोना बॉडीबॅग प्रकरणी किशोरी पेडणेकरांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

Body Bag Scam Case : माजी महापौर किशोरी पेडणेकरांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. शव पिशवी घोटाळ्याप्रकरणी त्यांना न्यायालयानं चार आठवड्यापर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत.

Bombay High Court
Bombay High Court
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 7:13 PM IST

मुंबई Body Bag Scam Case : मुंबईच्या माजी महापौर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांना उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. कोविड महामारीच्या काळातील शव पिशवी घोटाळ्या प्रकरणी उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनवणीदरम्यान किशोरी पेडणेकरांना चार आठवड्यापर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळं किशोरी पेडणेकरांना मोठा दिलासा मिळालाय.

अटकेची टांगती तलवार : कोरोना महामारी काळात 2020 मध्ये झालेल्या शव पिशवी खरेदीत बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याच्या प्रकरणात (उबाठा) गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांसह इतर चारजण सहभागी असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. यापूर्वी या प्रकणात 29 ऑगस्ट रोजी सुनावणी झाली होती.

चार आठवड्यापर्यंत दिलासा : यापूर्वी कोर्टानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. यामुळं कारवाईच्या भीतीनं पेडणेकरांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. याबाबत दोन दिवसांपूर्वी सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयानं त्यांना 6 सप्टेंबरपर्यंत दिलासा दिला. याप्रकरणी आज न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांनी याबाबत दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतला. त्यावर न्यायालयानं आरोपींना चार आठवड्यापर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले.

पुढील सुनावणी चार आठवड्यानंतर : मुंबई पोलीस विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, कोरोना महामारीच्या काळात शव पिशव्यांची खरेदी झाली होती. त्यात वेदांत इन्फोटेक कंपनीचे प्रमुख सतीश कल्याणपूर, एका अतिरिक्त आयुक्तासह इतर व्यक्तींचा समावेश आहे. मात्र, यात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा सहभाग असल्याचा आरोप होता. त्यांनी प्रशासनाला त्याबाबत सूचना केल्या होत्या. यामध्ये लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. या प्रकरणी पुढील सुनावणी चार आठवड्यानंतर होणार आहे.

हेही वाचा -

  1. Kirit Somaiya On Covid Scam : कथित व्हिडिओ क्लिपनंतर किरीट सोमय्या पुन्हा मैदानात; उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
  2. Mumbai Covid Scam : काही दिवसातच संजय राऊत कारागृहात - नितेश राणे
  3. BMC Covid Scam : कथित कोविड घोटाळा प्रकरण; विशेष तपास पथक आज बीएमसी कार्यालयात झाडाझडती घेण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.