मुंबई: मुंबईतील वर्सोवा किनार्याजवळील अरबी समुद्रात बोट उलटल्याची घटना घडली आहे. या बोटीतील दोन मच्छिमारांचा बुडून मृत्यू झाला असल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने वर्तविली आहे. शनिवारी रात्री 8 ते 9 वाजेच्या दरम्यान दोन मच्छीमार बोट घेऊन मासेमारीसाठी समुद्रात उतरले होते. वर्सोवा भागातील देवाचीवाडी येथून या दोघांनी आणि अन्य एकाने समुद्रात बोट सोडली होती. ही बोट समुद्रात दोन ते तीन किलोमीटर अंतर गेल्यानंतर पाण्यात उलटली. याविषयीची माहिती स्थानिक लोक आणि पोलिसांची हवाल्याने एका अधिकाऱ्याने दिली आहे.
विजय बामानिया (वय 35) नावा व्यक्ती पोहून सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचला आहे. मात्र दोन अजून बेपत्ता आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, उस्मानी भंडारी ( वय 22 ) आणि विनोद गोयल ( वय 45) अशी बेपत्ता झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. अग्निशमन दल, पोलीस, नौदल आणि जीवरक्षक दल बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत आहेत, असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकची माहिती देताना सांगितले.
सविस्तर माहिती थोड्याच वेळात...