ETV Bharat / state

निर्बीजीकरणानंतरही मुंबईतील श्वानांची संख्या वाढली; पालिका पुन्हा करणार १३ कोटी रुपयांचा खर्च - मुंबई श्वान निर्बीजीकरण न्यूज

राजधानी मुंबई असो किंवा एखादे खेडेगाव भटक्या श्वानांची समस्या ही सर्वत्र सारखीच आहे. सध्या भटक्या श्वानांमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. महानगरपालिका पुन्हा मुंबईतील ९८ हजार श्वानांचे निर्बीजीकरण करणार आहे.

Dogs
श्वान
author img

By

Published : Jan 26, 2021, 8:59 AM IST

मुंबई - राजधानी मुंबईमध्ये श्वानांची दहशत आहे. रात्री अपरात्री हे श्वान अंगावर येत असल्याने मुंबईकर त्रस्त आहेत. मात्र, त्यांना मारण्यास बंदी असल्याने महानगरपालिकेकडून श्वानांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी निर्बीजीकरण केले जाते. २०१४ ते २०१९ या काळात ९० हजार ४८५ श्‍वानांचे निर्बीजीकरण झाले. परंतु, भटक्या श्‍वानांची संख्या आतापर्यंत १ लाख ४० हजारवर पोहचली आहे. आता पुन्हा मुंबईतील ९८ हजार श्वानांचे निर्बीजीकरण केले जाणार आहे. त्यासाठी पालिका दोन वर्षांसाठी १३ कोटी ३९ लाख रुपये खर्च करणार आहे, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाला दिली.

श्वानांची संख्या वाढली -

मुंबईत २०१४ मध्ये झालेल्या श्‍वान गणनेत ९५ हजार १७२ भटक्या श्‍वानांची नोंद झाली होती. त्यातील २५ हजार ९३३ श्‍वानांचे निर्बीजीकरण झाले होते. तर, २०१४ ते २०१९ या काळात ९० हजार ४८५ श्‍वानांचे निर्बीजीकरण झाले. परंतु, भटक्या श्‍वानांची संख्या आतापर्यंत १ लाख ४० हजारावर पोहचली आहे. यापूर्वी अशासकीय संस्थांमार्फत श्वानांचे निर्बीजीकरण केले जात होते. ६०० ते १३०० रुपयांचे अनुदान यासाठी देण्यात येत होते. मात्र, आता केंद्राच्या प्राणी कल्याण मंडळाच्या शिफारशीनुसार हे दर १ हजार ते १६०० रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. दरानुसार महापालिकेने सात संस्थांशी २०२० मध्ये तीन वर्षांसाठी करार केला होता. मात्र, आता संस्थांनी वाढीव दर मागितल्याने सुधारीत दरानुसार शुल्क देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या स्थायी समितीच्या पटलावर या संदर्भातील प्रस्ताव मंजूरीसाठी ठेवला आहे.

२१ हजार श्‍वानांचे निर्बीजीकरण -

शासकीय संस्थांसोबत महानगरपालिकाही भटक्या श्‍वानांचे निर्बीजीकरण करते. मात्र, अशासकीय संस्थां मार्फत केलेल्या जाणाऱ्या निर्बीजीकरणाच्या तुलनेने ही संख्या निम्म्या पेक्षा कमी आहे. पालिकेने २०१४ ते २०१९ या काळात २१ हजार ३४४ श्‍वानांचे निर्बीजीकरण केले. तर,अशासकीय संस्थांच्या माध्यमातून ६९ हजार ३५९ श्‍वानांचे निर्बीजीकरण केल्याचे अशीही माहिती या प्रस्तावात नमुद आहे.

वर्षनिहाय निर्बीजीकरण -

  • २०१४ मध्ये पालिकेने ३५८७ तर अशासकीय संस्थानी ३६४९ असे एकूण ७२३६ श्वानांचे निर्बीजीकरण केले.
  • २०१५ मध्ये पालिकेने १८७७ तर अशासकीय संस्थानी ४५३७ असे एकूण ६४१४ श्वानांचे निर्बीजीकरण केले.
  • २०१६ मध्ये पालिकेने ५२३१ तर अशासकीय संस्थानी ६७३४ असे एकूण ११९६५ श्वानांचे निर्बीजीकरण केले.
  • २०१७ मध्ये पालिकेने ४१६९ तर अशासकीय संस्थानी २०१२१ असे एकूण २४२९० श्वानांचे निर्बीजीकरण केले.
  • २०१८ मध्ये पालिकेने २९७८ तर अशासकीय संस्थानी १८९०८ असे एकूण २१८८६ श्वानांचे निर्बीजीकरण केले.
  • २०१९ मध्ये पालिकेने ३५०२ तर अशासकीय संस्थानी १५४१० असे एकूण १८९१२ श्वानांचे निर्बीजीकरण केले.
  • या संस्थांना दिले जाणार काम व निधी -

    (१) द वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग्ज महालक्ष्मी - १ कोटी १७ लाख ३० हजार रुपये

    (२) द बॉम्बे सोसायटी फॉर प्रीव्हेंशन ऑफ क्रूएलटी टू ऍनिमल, देवनार - ६९ लाख ६० हजार रुपये

    (३) इन डिफेन्स ऑफ ऍनिमल्स, देवनार - २ कोटी ४१ लाख ५० हजार रुपये

    (४) अहिंसा, मालाड - १ कोटी ३८ लाख रुपये

    (५) उत्कर्ष मित्र मंडळ, मुलुंड - २ कोटी ४३ लाख ६० हजार रुपये

    (६) युनिव्हर्सल ऍनिमल्स वेल्फेअर सोसायटी, मालाड -: ४ कोटी ३५ लाख रुपये

    (७) मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ - ४२ लाख ९० हजार रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.