ETV Bharat / state

Training On Emergency Management : बृहन्मुंबई महानगरपालिका देणार आपत्कालीन व्यवस्थापनाचे मोफत प्रशिक्षण ;'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापनाचे मोफत प्रशिक्षण देणार आहे. त्यासाठी 12 दिवसांचा 'आपदा मित्र' विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी 12 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. या प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई शहर व मुंबई उपनगरातील प्रत्‍येकी ५०० याप्रमाणे एकूण १००० नागरिकांना प्रशिक्षित करण्‍यात येणार आहे.

BMC will provide free training on emergency management
बृहन्मुंबई महानगरपालिका
author img

By

Published : Jan 21, 2023, 11:53 AM IST

मुंबई : केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशांनुसार १८ ते ४० वयोगटातील मुंबईकर नागरिकांसाठी ‘आपदा मित्र’ हा १२ दिवसांचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रात सुरु करण्यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात येणारे हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असणार आहे. अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

1000 मुंबईकरांना प्रशिक्षण : या प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना आपत्कालीन व्यवस्थापन खात्याच्या प्रमुख रश्मी लोखंडे यांनी सांगितले की, भारत सरकारचे राष्‍ट्रीय आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील राज्‍य आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण यांच्‍या निर्देशांनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी अर्थात मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्‍हा या २ जिल्ह्यांच्या आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणांमार्फत बृहन्‍मुंबईतील रहिवाशी असणाऱ्या नागरिकांना सहभागी होता येईल. रविवार वगळता १२ दिवसांचा हा प्रशिक्षण कार्यक्रम आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन विभागाच्‍या परळ येथील आपत्ती व्‍यवस्‍थापन प्रशिक्षण केंद्रात सुरु करण्‍यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशिक्षण प्राप्‍त असलेल्या प्रशिक्षित नागरिकांची गरजूंना मदत व्हावी आणि संभाव्य जीवित व वित्तहानी कमीतकमी व्हावी, या प्रमुख उद्देशाने हे प्रशिक्षण सुरु करण्यात येत आहे. या प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई शहर व मुंबई उपनगरातील प्रत्‍येकी ५०० याप्रमाणे एकूण १००० नागरिकांना प्रशिक्षित करण्‍यात येणार आहे.

'या' वयोगटातील नागरिकांना प्रशिक्षण : या प्रशिक्षण कार्यक्रमात वय वर्षे १८ ते ४० या वयोगटातील किमान ७ वी उत्तीर्ण असलेले मुंबईचे रहिवाशी अर्ज करु शकतात. सोबतच, संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेले, वैद्यकीय व्यवसायिक आणि स्थापत्य अभियंता यांच्यासाठी वयाचे निकष शिथिल केले जाऊ शकतात. या प्रशिक्षणासाठी अर्ज असणाऱ्या व्यक्तींचे शारिरीक, मानसिक व वैद्यकीय आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक ते फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल. तसेच आपत्ती प्रतिसाद कार्यात स्वंयसेवा करण्याचा पूर्वानुभव असलेल्या अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल.

150 रुपये प्रवास भत्ता देखील : या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून आपत्ती व्‍यवस्‍थापनाचे धडे प्रात्यक्षिकांसह देण्यात येतील. यामध्ये पूर बचाव, शोध व बचावकार्य, प्रथमोपचार, सीपीआर, प्राथमिक अग्निशमन इत्‍यादीचे प्रात्‍याक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण स्थळी ये-जा करण्‍याकरिता दैनंदिन १५० रुपये इतका भत्ता देण्यात येईल. त्याचबरोबर प्रशिक्षणा दरम्‍यान प्रशिक्षणार्थींच्‍या चहा व भोजनाची व्‍यवस्‍था करण्यात येईल. १२ दिवसांचे प्रशिक्षण यशस्‍वीरित्‍या पूर्ण केल्‍यानंतर आपदा मित्र प्रमाणपत्र व ओळखपत्र देखील प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

नोकरी मिळण्‍याकरिता प्रशिक्षण नाही : या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी अर्जासोबत त्यांचे रहिवाशीत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल. आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, नजिकच्या काळातील विद्युत देयक इत्यादी. या प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी कृपया बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन विभागाशी ०२२ -२२६९४७२५ ते २७ या संपर्क क्रमांकांवर अथवा co.dm@mcgm.gov.in या ई मेल पत्त्यावर संपर्क साधावा. तसेच कृपया नोंद घ्यावी की, 'आपदा मित्र' प्रशिक्षण हे बृहन्‍मुंबई महानगरपालिकेत कोणत्‍याही प्रकारची नोकरी मिळण्‍याकरिता नाही.

हेही वाचा : Emergency Management Training : धोकादायक इमारती व दरडी जवळील नागरिकांनाही आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.