ETV Bharat / state

BMC Help to BEST : पालिका देणार 'बेस्ट'ला ६,६५० कोटींचे अनुदान, काँग्रेसचा विरोध - मुंबई मनपा आणि बेस्ट लेटेस्ट बातमी

मुंबईकरांची लाईफलाईन असलेला बेस्ट ( Mumbai's Lifeline BEST ) उपक्रम आर्थिक संकटात आहे. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ६,६५० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. ही रक्कम मुंबई महापालिकेकडून बेस्टला दिली जाणार आहे.

BMC Help to BEST
पालिका देणार 'बेस्ट'ला ६,६५० कोटींचे अनुदान
author img

By

Published : Jan 18, 2022, 9:26 PM IST

मुंबई - मुंबईकरांची लाईफलाईन असलेला बेस्ट ( Mumbai's Lifeline BEST ) उपक्रम आर्थिक संकटात आहे. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ६,६५० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. ही रक्कम मुंबई महापालिकेकडून बेस्टला दिली जाणार आहे. ( BMC Help to BEST ) मात्र, अशी रक्कम बेस्टला देण्यास पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा ( Ravi Raja BMC ) विरोध करणार आहेत. बेस्टने आपल्या कामात सुधारणा करून स्वतःच्या पायावर उभे राहावे, अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.

६६५०.३१ कोटींचे अनुदान देणार -

बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात आहे. यामुळे बेस्टने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा २२०० कोटी तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प सादर करताना बेस्टला ६६०० कोटींची देणी देणे आहे. तुटीचा अर्थसंकल्प बेस्ट व स्थायी समितीने मंजूर केला आहे. ही तूट पालिकेने अनुदान म्हणून द्यावी, अशी बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी स्थायी समितीत अर्थसंकल्पावरील चर्चेनंतर आपल्या भाषणात विनंती केली होती. त्यानुसार पालिका बेस्टला ६६५०.३१ कोटींचे अनुदान देणार आहे. हा अनुदान देण्याचा प्रस्ताव तातडीचे कामकाज म्हणून पालिका सभागृहाने आधीच मंजुर केला आहे. आता हा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत माहितीसाठी सादर करण्यात आला आहे.

हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत आज पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले, 'इतक्या' जणांचा झाला मृत्यू

काँग्रेसचा विरोध -

बेस्टला ६६५०.३१ कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेत माहितीसाठी येत असला तरी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी या प्रस्तावाला विरोध असून त्यावर चर्चा घडवून आणणार असल्याचे म्हटले आहे. स्थायी समितीमध्ये पालिकेने बेस्टला अनुदान देऊ नये, अशी मागणी करणार असल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे. बेस्टकडे ३२० एकर जमीन आहे. त्या जमिनीचा बेस्टने विकास करावा व निधी उभा करावा किंवा ती जमीन पालिकेला द्यावी पालिकेने त्या जमिनीचा विकास करावा, अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.

विरोधी पक्ष नेत्यांचा गैरसमज -

बेस्ट मुंबई महापालिकेचा अंगीकृत उपक्रम आहे. बेस्टला गरज असल्याने पालिकेने मदत केली आहे. बेस्टला पालिका मदत करणार नाही तर कोण करणार, असा प्रश्न उपस्थित करत रवी राजा यांचा याबाबत गैरसमज झाला असावा, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.