ETV Bharat / state

बृहन्मुंबई पालिका वरळीत बांधणार 216 कोटी रुपयांचे पार्किंग स्टेशन, 640 कार पार्किंगची असणार क्षमता

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 6:25 PM IST

Parking Station In Worli: बृहन्मुंबई महानगरपालिकेने वरळीत 216 कोटी रुपयांचे पार्किंग स्टेशन बांधण्याचे ठरविले आहे. यामध्ये 640 कार पार्क करता येणार आहे. (Car Parking Worli) त्यासाठी महापालिकेने निविदा काढल्या आहेत. प्रगत, भूमिगत आणि उन्नत बहुस्तरीय पार्किंग व्यवस्था अशा योजना, डिझाइन तयार करू शकतील (BMC) अशा इच्छुक कंपन्यांनी निविदा भराव्यात असे आवाहन पालिकेने केले आहे.

Parking Station In Worli
वरळीतील पार्किंग स्टेशन

मुंबई Parking Station In Worli : बृहन्मुंबई महानगरपालिकेनं G दक्षिण वॉर्ड म्हणजे वरळीमध्ये पार्किंग सुविधा तयार करण्याची योजना जाहीर केली आहे. पार्किंगची जागा डॉ. ई. मोसेस रोडवरील पालिका इंजिनिअरिंग हब इमारतीजवळ असेल. यात सुमारे 640 कार पार्क करता येतील. या कामासाठी पालिका तब्बल 216 कोटी रुपयांचा निधी खर्च करणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. (Parking Station Tender)

पालिकेनी काढली निविदा : बृहन्मुंबई पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी 216.94 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा काढल्या आहेत. प्रगत, भूमिगत आणि उन्नत बहुस्तरीय पार्किंग व्यवस्था अशा योजना, डिझाइन तयार करू शकतील अशा इच्छुक कंपन्यांनी निविदा भराव्यात असं आवाहन पालिकेने केलं आहे. पालिकेने निविदांमध्ये इच्छुक असलेल्या कंपन्यांसाठी आवश्यकता देखील दिल्या आहेत. यामध्ये वार्षिक देखभाल व्यवस्थापित करणे आणि पूर्ण झाल्यानंतर वीस वर्षे पार्किंगची देखभाल करणे समाविष्ट आहे.

ब्ल्यू प्रिंट तयार करण्याची गरज : याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित ठेकेदाराला पाच वर्षे पार्किंग व्यवस्था चालवणे, देखभाल करणे आणि साफसफाईची जबाबदारीही घ्यावी लागणार आहे. निविदा काढण्यापूर्वी कंपनीला संपूर्ण पार्किंगची ब्ल्यू प्रिंट तयार करून माती परीक्षण करून घ्यावे लागेल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. कंत्राटदार कंपनीने पालिकेच्या अभियंत्यांना मजले, खड्डे, वीज, फायर अलार्म, पॉवर सोर्स, दर्शनी दिवे, मजल्यापर्यंतच्या रस्त्यांशी जोडणी आणि पार्किंगची जागा यासारख्या विविध पैलूंवर ते कसे काम करतील याचा प्लॅन देणे आणि याबद्दल माहिती देणे आवश्यक आहे. या योजनांना नंतर पालिकेचे प्रभारी अभियंता मान्यता देतील.

पालिकेने घातल्या या अटी : यातील आणखी महत्त्वाची बाब म्हणजे, ठेकेदाराने सध्याची पार्किंगजी जागा भरून त्या जागेची लेवल करणे आवश्यक आहे. सोबतच जुन्या वास्तूच्या पाडलेल्या ढिगार्‍यातून वापरता येण्याजोग्या वस्तू गोळा करून त्या पालिकेच्या गोडाऊनमध्ये पोहोचवणे आवश्यक आहे. तसंच अनावश्यक टाकाऊ वस्तू आणि कचरा पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्राधिकरणाने निर्दिष्ट केलेल्या ठिकाणी अवशेषांची विल्हेवाट लावावी लागेल. हे पार्किंग स्टेशन बांधताना कंत्राटदाराला नवीन इंजिनिअरिंग हबचे छत आणि रॅम्पही विहित प्रक्रियेनुसार पाडावा लागणार आहे.

यासाठी लागेल ना-हरकत प्रमाणपत्र : या सर्व कामात ठेकेदाराला मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनकडून दुचाकी पार्किंगसाठी जागा आणि सुरक्षा विभागासाठी दारूगोळा ठेवण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. ते मिळवून देण्यासाठी पालिका मदत करेल, असं आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.

हेही वाचा:

  1. INDIA आघाडी तुटण्याच्या मार्गावर? शिवसेना महाराष्ट्रात २३ जागांवर ठाम, ममता बॅनर्जींचा बंगालमध्ये एकला चलोचा नारा
  2. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर दिसणार का महाराष्ट्राचा चित्ररथ? प्रशासनानं दिलं 'हे' उत्तर
  3. लोकसभेसाठी महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम, शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये धुसफुस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.