ETV Bharat / state

BMC Water Supply Pipeline Burst : झोपेत असतानाच अनेकांच्या घरात शिरले पाणी, पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर - Today News

मुंबई महापालिकेची घाटकोपर असल्फा (Ghatkopar Asalfa) येथील 72 इंचाची पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आज शनिवारी पहाटे (BMC water supply pipeline burst) फुटली. यामुळे अनेक घरामध्ये पाणी घुसून नुकसान (Today Many citizens effected) झाले आहे. दरम्यान पालिकेने या ठिकाणी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले असून; काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर पाणी पुरवठा सुरू केला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

BMC Water Supply Pipeline Burst
पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर
author img

By

Published : Dec 31, 2022, 3:32 PM IST

घाटकोपर असल्फा येथील पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

मुंबई : मुंबई म्हणटलं की सगळ्याच गोष्टी अगदी गुतागंतीच्या. त्यामुळे तिथे थोडे जरी काही घडले की, त्याता थेट प्रभाव नागरीकांवर पडतो. अशीच एक घटना आज घडली. मुंबई महापालिकेची घाटकोपर असल्फा (Ghatkopar Asalfa) येथील 72 इंचाची पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन शनिवारी (BMC water supply pipeline burst) पहाटे फुटली. यामुळे अनेक घरामध्ये पाणी घुसून नुकसान (Many citizens effected) झाले आहे. दरम्यान पालिकेने या ठिकाणी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले असून; काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर पाणी पुरवठा सुरू केला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पाईपलाईन फुटली : मुंबईला दररोज ३८५० दशलक्ष लिटर इतके पाणी रोज सात धरणांमधून नागरिकांना पुरवठा केले जाते. त्यासाठी पालिकेने जागोजागी पाईप लाईन टाकली आहे. यापैकी घाटकोपर असल्फा व्हीलेज, गोसिया मस्जिद, पाईप लाईन रोड येथील 72 इंची पाईप लाईनमध्ये शनिवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गळती झाली. ही पाईपलाईन मोठी असल्याने विभागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. झोपेत असतानाच अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

काम युद्धपातळीवर : दरम्यान पाईप लाईन फुटल्याची माहिती मिळताच चांदिवली ब्रिज, घाटकोपर येथे पालिकेच्या जल विभागाचे कर्मचारी पोहचले. युद्धपातळीवर कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले. पवई व्हेंचरी येथे व्हॉल्व्हचे काम सुरू झाले आहे. काही कालावधीत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर पाणी पुरवठा पुन्हा सुरू केला जाईल, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.