ETV Bharat / state

महापालिका कंत्राटदारांवर मेहेरबान; निविदा भरताना सुरक्षा अनामत रक्कम भरण्यातून दिली सूट

author img

By

Published : Feb 11, 2021, 12:53 PM IST

मुंबई महानगरपालिकेकडून, निविदा भरताना कामाच्या किमतीपेक्षा १२ टक्क्यांहून कमी रक्कमेची निविदा भरणाऱ्या सर्व निविदाकारांना ऑनलाईन अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. कोरोनामुळे कंत्राटदार अडचणीत आले असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

BMC lens on contractors who quote lowest for e-tenders in nick of time
महापालिका कंत्राटदारांवर मेहेरबान; निविदा भरताना सुरक्षा अनामत रक्कम भरण्यातून दिली सूट

मुंबई - महापालिका अधिकारी आणि कंत्राटदारांचे साटेलोटे असल्याची नेहमीच चर्चा असते. कंत्राटदाराचे खिसे भरण्याचे काम प्रशासनाकडून केले जाते, असा आरोप नेहमीच केला जातो. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा समोर आला आहे. निविदा भरताना कामाच्या किमतीपेक्षा १२ टक्क्यांहून कमी रक्कमेची निविदा भरणाऱ्या सर्व निविदाकारांना ऑनलाईन अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. कोरोनामुळे कंत्राटदार अडचणीत आले असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे महानगरपालिका कामांच्या निविदांना अधिकाधिक प्रतिसाद मिळणे शक्य होणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

या नियमात केले बदल -
बृहन्मुंबई महानगरपालिकेत कंत्राटदारांमार्फत विविध कामे करण्यात येतात. सध्याच्या पद्धतीनुसार, या कामांसाठी ऑनलाईन ई-निविदा प्रक्रियेमध्ये ज्या-ज्या निविदाकारांनी कामाच्या रक्कमेच्या वजा १२ टक्के पेक्षा कमी दराने टक्केवारी नमूद केली आहे, अशा सर्व निविदाकारांकडून वजा १२ टक्केपेक्षा जास्त नमूद केलेल्या प्रत्येक टक्क्याला १ टक्के याप्रमाणे, कोणतीही मर्यादा न ठेवता, अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम ऑनलाईन स्वीकारली जाते. या प्रचलित तरतुदीमध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे. निविदा प्रक्रियेअंती जो निविदाकार कमी बोली लावेल त्याला काम देण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी किंवा इतर प्राधिकरणासमोर सादर केला जातो. कंत्राटदाराला काम देण्यासाठी प्रशासनाने पत्र दिल्यानंतर, कंत्राट रकमेनुसार, कार्यालयीन कामकाजाच्या १५ दिवसांत, विद्यमान तरतुदीनुसार अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम डिमांड ड्राफ्ट स्वरुपात देणे आवश्यक असेल. महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात हा डिमांड ड्राफ्ट जमा करणे व त्या पावतीची प्रत खातेप्रमुखांकडे सादर करणे हे निविदाकारास आवश्यक असेल. ही अट यापुढे महानगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या कार्यस्वीकृती पत्रात देखील नमूद केलेली असेल.

दोन वर्षासाठी होणार कारवाई -
जर प्रथम लघुत्तम निविदाकाराने कार्यस्वीकृती पत्रात नमूद केल्यानुसार (After Giving LOA) कार्यालयीन कामकाजाच्या १५ दिवसांमध्ये अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम जमा केली नाही तर, संबंधित निविदाकाराने भरणा केलेली इसारा अनामत रक्कम (EMD) संपूर्ण जप्त केली जाईल. तसेच त्या कंपनीला दोन वर्षांसाठी प्रतिबंधित (डिबार-Debar) करण्यात येईल. त्याचप्रमाणे त्या कंपनीचे संचालक, भागीदार इतर कंपनीमध्ये संचालक, भागीदार म्हणून कार्यरत असतील तर ती कंपनीसुद्धा दोन वर्षांकरिता प्रतिबंधित (डिबार-Debar) करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे प्रशासनाने कळविले आहे.

कंत्राटदाराला दिलासा -
अतिरिक्त सुरक्षा अनामत रकमेबाबतच्या या बदलामुळे, सर्व निविदाकारांना ऑनलाईन निविदा सादर करताना अतिरिक्त सुरक्षा रक्कम भरण्याची आवश्यकता राहणार नाही. तर कंत्राट प्रक्रियेअंती पात्र प्रथम लघुत्तम निविदाकारालाच अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम द्यावी लागेल. कार्यस्वीकृती पत्रात नमूद केल्यानुसार (After Giving LOA) कार्यालयीन कामकाजाच्या १५ दिवसांमध्ये अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम भरण्याची मुदत त्याला देण्यात आली आहे. अतिरिक्त सुरक्षा अनामत रकमेबाबतच्या या तरतुदीतील सुधारणेमुळे, कोविड-१९ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत निविदाकारांना दिलासा प्राप्त होणार आहे, असे पालिका प्रशासनाने कळविले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.