ETV Bharat / state

BMC Security Guards Recruitment : मुंबई महापालिकेत ८४९ सुरक्षा रक्षकांची भरती येत्या सहा महिन्यात

author img

By

Published : Jan 1, 2023, 7:14 PM IST

मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालय, मालमत्ता तसेच पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची सुरक्षा करण्यासाठी सुरक्षा विभाग आहेत. या विभागात गेल्या ४ वर्षांत भरती न झाल्याने १७३५ पदे रिक्त आहेत. त्यापैकी ५० टक्के म्हणजेच ८४९ सुरक्षा रक्षकांची भरती (BMC Security Guards Recruitment) करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. याबाबत प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू असून येत्या सहा महिन्यात भरती प्रकिया पूर्ण होऊ शकते अशी माहिती सुरक्षा विभागाकडून (BMC Security Department) देण्यात आली आहे. यामुळे बेरोजगार तरुणांना पालिकेची नोकरी मिळवण्याची संधी (Job opportunity in BMC) उपलब्ध होणार आहे. (Latest news from Mumbai)

BMC Security Guards Recruitment
मुंबई महापालिका

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत सध्या सुरक्षा रक्षक (BMC Security Guards Recruitment) पदावर कार्यरत असणाऱ्यांची एकूण संख्या २ हजार १९४ असली तरी अजूनही १ हजार ७१५ पदे सुरक्षा रक्षकांची पदे रिक्त आहेत. (BMC Security Department) मुख्य रक्षक पदी २०५ जण कार्यरत असून १० पदे रिक्त आहेत. तर जमादारपदी ३७ जण कार्यरत असून १० पदे रिक्त आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत सुरक्षा रक्षक विभागात एकूण २ हजार ३४७ पदे कार्यरत असून १ हजार ७३५ पदे रिक्त आहेत. ही पदे तात्काळ भरण्यात यावीत अशी मागणी म्युनिसिपल युनियनने कामगार आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान, भरती प्रक्रिया सुरु करण्यासाठी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आदेश दिले होते. त्यानुसार ८४९ सुरक्षा रक्षक पदे भरण्यासाठी प्रशासकीय स्तरावर कार्यवाही सुरु आहे. (Latest news from Mumbai)

पालिकेवर कसाबचा गोळीबार : मुंबई महापालिकेच्या मुख्यालय इमारतींची सुरक्षा रक्षकांकडून केली जाते. सध्या मुख्यालय इमारतीची सुरक्षा करण्यासाठी ६९ सुरक्षा रक्षक कर्मचारी हे तीन शिफ्टमध्ये कार्यरत आहेत. मात्र येथे २४ जागा रिक्त आहेत. मुख्यालयात एका शिफ्टमध्ये केवळ २३ सुरक्षा रक्षक कर्मचारी तैनात असतात. त्यातही सुट्टीवर गेल्यास एका शिफ्टमधील २३ ची संख्या आणखी कमी होते. मुंबई महापालिकेचे मुख्यालय हे नेहमीच दहशतवाद्यांच्या केंद्र स्थळी राहिले आहे. पाकिस्तानी आतंकवादी अजमल कसाब याने मुंबईवर हल्ला केला होता. त्यावेळी पालिकेच्या, मागील बाजूस केलेल्या गोळीबारात एका सुरक्षा रक्षकाला गोळी लागली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.