ETV Bharat / state

पत्रकारांवर बंदी घालणाऱ्या केईएमच्या अधिष्ठात्यांची चौकशी करा, महानगरपालिका विरोधी पक्षनेत्याची मागणी

मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात देशभरातून रुग्ण उपचारासाठी येतात. उत्तर प्रदेशमधून प्रिन्स राजभर या दोन महिन्यांच्या बालकाच्या हृदयात छिद्र असल्याने उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पलंगाजवळ असलेल्या ईसीजी मशीनमध्ये शॉक सर्किट होऊन पलंग जळाला. यात प्रिन्सचा एक हात, चेहऱ्याचा व छातीचा काही भाग भाजला.

जखमी प्रिन्स राजभर
author img

By

Published : Nov 15, 2019, 12:03 PM IST

मुंबई - महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात शॉक सर्किट होऊन प्रिन्स राजभर या दोन महिन्याच्या बालक भाजल्याने त्याचा एक हात कापण्यात आला आहे. सध्या राज्यभर हे प्रकरण गाजत आहे. त्यामुळे प्रिन्सच्या कुटूंबियांना भेटण्यास रुग्णालय प्रशासनाने पत्रकारांवर बंदी घातली आहे. या बंदी प्रकरणी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची चौकशी करावी, अशी मागणी महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.

केईएमच्या अधिष्ठात्यांची चौकशी करा - महानगरपालिका विरोधी पक्ष नेत्यांची मागणी

मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात देशभरातून रुग्ण उपचारासाठी येतात. उत्तर प्रदेशमधून प्रिन्स राजभर या दोन महिन्यांच्या बालकाच्या हृदयात छिद्र असल्याने उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पलंगाजवळ असलेल्या ईसीजी मशीनमध्ये शॉक सर्किट होऊन पलंग जळाला. यात प्रिन्सचा एक हात, चेहऱ्याचा व छातीचा काही भाग भाजला. या दुर्घटनेत प्रिन्स 20 ते 22 टक्के भाजल्याचे समजते. या प्रकरणाचे पडसाद पालिकेतील स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. प्रिन्सच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची तसेच दोषी अधिष्ठाता आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षातर्फे करण्यात आली आहे.

हेही वाचा - जखमी प्रिन्सची जबाबदारी मुंबई महापालिकेने घ्यावी; काँग्रेसची मागणी

प्रिन्सच्या प्रकृतीबाबत माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना रुग्णालय प्रशासनाने रोखले. अधिष्ठात्यांची लेखी परवानगी घेतल्यानंतरच प्रिन्सच्या कुटुंबियांना भेटता येईल, असे रुग्णालयाच्या सुरक्षा विभागाकडून सांगण्यात येत आहे. परवानगी घेण्यासाठी गलेल्या पत्रकारांना आरोपीप्रमाणे वागणूक दिली जात आहे.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईन'ची राऊत यांनी अशी उडवली खिल्ली

या प्रकरणाचा विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी निषेध नोंदवला आहे. पत्रकारितेला भारतात लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते. त्यांच्यावर निर्बंध टाकून अधिष्ठाता लोकशाहीचा अपमान करत आहेत, असे मत रवी राजा यांनी मांडले. स्थायी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केईएमच्या अधिष्ठात्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. हा मुद्दा पालिका सभागृहातही मांडणार असल्याचे राजा यांनी सांगितले.

Intro:मुंबई - मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात प्रिन्स राजभर या दोन महिन्याचा मुलगा शॉकसर्किट होऊन भाजल्याने त्याचा एक हात कापण्यात आला आहे. प्रिन्सच्या कुटूंबियांना भेटण्यास पत्रकारांना भेटण्यास रुग्णालय प्रशासनाने बंदी घातली आहे. यामुळे रुग्णालयाच्या डीनची या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे. Body:मुंबई महापालिकेचे केईएम हे सर्वात मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयात देशभरातून रुग्ण आपल्यावर उपचार करण्यासाठी येतात. उत्तर प्रदेशच्या मवू मधून प्रिन्स राजभर या दोन महिन्याच्या मुलाला हृदयात छेद असल्याने उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या बेडजवळ असलेल्या ईसीजी मशीनमध्ये शॉकसर्किट झाले आणि बेड जळाला. त्यात प्रिन्सचा एक हात, चेहऱ्याचा व छातीचा भाग जळाला. या दुर्घटनेत प्रिन्स 20 ते 22 टक्के जळाल्याचे समजते. या प्रकरणाचे स्थायी समितीच्या बैठकीत पडसाद उमटले. प्रिन्सच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची तसेच दोषी डीन व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रिन्सची प्रकृती कशी आहे, त्याचे वडील नोकरी सोडून प्रिन्सचा उपचार करत आहेत. याची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना भेटण्यापासून रुग्णालय प्रशासनाने रोखले आहे. डीनची लेखी परवानगी आणली तरच प्रिन्सच्या कुटुंबियांना भेटण्यास दिले जाईल असे रुग्णालयाच्या सुरक्षा विभागाकडून सांगण्यात येत आहे. वेळ प्रसंगी डीनच्या कार्यालयात पत्रकारांना आरोपी प्रमाणे नेले जात आहे. त्यानंतर आम्ही प्रिन्सच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही असे सांगितले जात आहे.

या प्रकरणाचा विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी निषेध नोंदवला आहे. केईएमचे डीन ज्या प्रकारे वागत आहेत त्यावरून त्यांनी आपल्या कामात दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. पत्रकारिता भारतात लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे
असे प्रकार घडले की पत्रकार माहिती घ्यायला येतात. त्यांच्यावर अशी बंदी घालणे चुकीचे असल्याचे मत रवी राजा यांनी मांडले आहे. स्थायी समितीच्या बैठकीत सर्व पक्षीय नगरसेवकांनी डीनला निलंबित करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने यावर काहीही कारवाई केलेली नाही. याबाबत पालिका सभागृहात हा प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पत्रकारांवर बंदी घालण्याचे आदेश कोणी दिले, याची चौकशी करावी पालिका आयुक्तांनी करावी अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.

विरोधी पक्ष नेते रवी राजा यांची बाईटConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.