ETV Bharat / state

Mohit Kamboj : अनधिकृत बांधकाम प्रकरण; बीएमसीचे अधिकारी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या चौकशीसाठी दाखल - illegal construction mohit kamboj latest news

अनधिकृत बांधकाम प्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज ( Bjp Leader Mohit Kamboj ) यांना पालिकेकडून नोटीस प्राप्त झाल्यानंतर आज मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी मोहित कंबोज यांच्या मुंबईतील सांताक्रूझ येथील निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झाले आहेत. ( BMC Officials at Mohit Kamboj House )

Mohit Kamboj
मोहित कंबोज
author img

By

Published : Mar 23, 2022, 1:36 PM IST

Updated : Mar 23, 2022, 5:42 PM IST

मुंबई - अनधिकृत बांधकाम प्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज ( Bjp Leader Mohit Kamboj ) यांना पालिकेकडून नोटीस प्राप्त झाल्यानंतर आज मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी मोहित कंबोज यांच्या मुंबईतील सांताक्रूझ येथील निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झाले आहेत. ( BMC Officials at Mohit Kamboj House ) महापालिकेच्या एच पश्चिम प्रभाग कार्यालया मार्फत खार येथील कंबोज यांच्या निवासस्थानाच्या तपासणीसाठी ही नोटीस पाठवली आहे. यासंदर्भात मोहित कंबोज यांनी माध्यमांशी संवाद साधला.

माध्यमांशी बोलताना भाजप नेता मोहित कंबोज

काय म्हणाले मोहित कंबोज? 'तुम्हारे पास ED है तो हमारे पास मुंबई पोलीस' असा काहीसा खेळ सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. विरोधकांना दाबण्यासाठी एका बाजूला भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातोय. तर, दुसर्‍या बाजूला महाराष्ट्रात देखील पोलीस व पालिका प्रशासनाचा गैरवापर होत असल्याचा आरोप सध्या महाराष्ट्रातील नेते एकमेकांवर करत आहेत. असाच काहीसा आरोप करत भाजप नेते मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना थेट आव्हान दिलं आहे.

हेही वाचा - Girish Mahajan Pen Drive Case : पेन ड्राईव्ह प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी; गिरीश महाजनांची याचिका

कंबोज म्हणाले की, "महाराष्ट्रात या महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्टाचार जो कोणी बाहेर काढतो त्याच्यावर एक तर पालिकेची धाड पडते अथवा मुंबई पोलिसांची कोणत्या ना कोणत्या कारणात नोटीस येते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबतीत तेच झालं. अभिनेत्री कंगना रणौतच्या बाबतीत तेच झालं. अगदी अर्नब गोस्वामी यांच्या बाबतीत देखील या सरकारने अशीच कारवाई केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जे काही करायचं ते करावं, मी घाबरणार नाही. माझ्या विरोधात कोणतीही चौकशी लावा, नोटिसा पाठवा पण मी मागे हटणार नाही. या महाविकास आघाडी सरकारविरोधातील माझा संघर्ष हा नेहमी सुरूच राहील," असं कंबोज यांनी म्हटलं आहे.

Last Updated : Mar 23, 2022, 5:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.