ETV Bharat / state

Mumbai Pollution : पंतप्रधानांच्या ड्रीम प्रोजेक्टला पालिकेची नोटीस; प्रदूषण नियम न पाळल्यास बुलेट ट्रेनचं काम बंद करणार - प्रदूषण

Mumbai Pollution : मुंबई आणि दिल्लीत यंदा दिवाळीपूर्वीच हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली आहे. आजूबाजूला विषारी हवा आणि धुक्यामुळं लोकांना घराबाहेर पडणं कठीण झालंय. सततच्या वाढत्या प्रदूषणामुळं लोकांना आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं बीकेसी येथील बुलेट ट्रेनच्या कामाला देखील नोटीस पाठवल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे.

BMC Bullet Train Notice
पंतप्रधानांच्या ड्रीम प्रोजेक्टला पालिकेची नोटीस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 5:40 PM IST

मुंबई Mumbai Pollution : सध्या मुंबईतील बदलत्या हवामानामुळे हवेची गुणवत्ता खालावाली आहे. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा स्तर खालावल्यानं मुंबईकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 'अत्यंत खराब' श्रेणीत आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात लोकांना समस्यांना सामोरं जावं लागत आहे. वायू प्रदूषण नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या कारवाईमध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकनं मुंबईतील बांधकाम व्यवसायिक व कारखान्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला नोटीस : मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पालिकेनं ऑक्टोबर महिन्यात 27 मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली होती. यामध्ये बांधकाम व्यवसायिकांना सूचना करण्यात आल्या होत्या. तसंच जी काही शासकीय कामं आहेत, त्यामध्ये कोस्टल रोड, मेट्रो आणि बुलेट ट्रेन अशा बांधकामाच्या ठिकाणी देखील पालिकेने या मार्गदर्शक सूचना लागू होतात असं जाहीर केलं होतं. मात्र, या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यानं बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या (Mumbai Ahmedabad Bullet Train) कामाला नोटीस पाठवण्यात आली आहे.

पाण्याचा फवारा मारण्याचा दिला आदेश : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी आकडेवारीनुसार मुंबईतील सर्वाधिक प्रदूषणाची नोंद ही बीकेसी येथे करण्यात आली आहे. त्यानंतर गोवंडी, चेंबूर या विभागांचा नंबर लागतो. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील प्रदूषण सर्वात जास्त असण्याचं कारण तिथे सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम आणि तिथून उडणारी धूळ हे सांगितलं जातं. या दोन्हीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिकेनं या बांधकामाला चारही बाजूनं आच्छादन लावण्याचे आदेश दिले होते. त्यासोबतच तिथे नियमित पाण्याचा फवारा मारण्याचे आदेश देखील पालिकेकडून बुलेट ट्रेन प्रकल्पाला देण्यात आले होते. मात्र, वारंवार सूचना देऊनसुद्धा या नियमांची अंमलबजावणी न झाल्यानं अखेर मुंबई महानगरपालिकेनं बुलेट ट्रेन प्रशासनाला नोटीस दिली आहे. सोबतच यापुढे या नियमांची अंमलबजावणी न झाल्यास काम बंद करण्यात येईल अशी ताकीदसुद्धा देण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation Row : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी; उपोषणाला परवानगी नाकारली
  2. Air Pollution Issue Mumbai : मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 6 नोव्हेंबर पूर्वीच मंत्रालय खडबडून जागे
  3. PM Modi Shirdi Visit : पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणारा शिर्डीतील दर्शनरांग प्रकल्प कसा आहे? पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.