ETV Bharat / state

Sharad Pawar: मुंबई आयुक्तांना शरद पवार यांचा कॉल; आयुक्तांनी तात्काळ ५० हजार विद्यावेतन देण्याचे केले जाहीर

author img

By

Published : Apr 26, 2023, 11:00 PM IST

मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यात गेली कित्येक वर्षे इंटर्नशिप करणार्‍या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात ५० हजार रुपये वाढ व्हावी यासाठी आज बीएमसी मुंबई सीपीएस स्टुडंट असोसिएशनच्या निवासी डॉक्टरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.

Sharad Pawar
शरद पवार यांना निवेदन

मुंबई: गेली कित्येक वर्षे मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यात इंटर्नशिप करणार्‍या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात ५० हजार रुपये वाढ व्हावी, यासाठी आज बीएमसी मुंबई सीपीएस स्टुडंट असोसिएशनच्या निवासी डॉक्टरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. मुंबई आयुक्त इक्बालसिंग चहल यांना शरद पवार यांनी कॉल केला. निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतन ५० हजार करण्याची मागणी केली.तर आयुक्तांनी तात्काळ ५० हजार विद्यावेतन देण्याचे जाहीर केले.

राज्यातील इतर ठिकाणी ज्यादा विद्यावेतन: दहा ते पंधरा वर्षापासून मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यात इंटर्नशिप करणार्‍या निवासी डॉक्टर विद्यार्थ्यांना फक्त पंधरा हजार एवढेच विद्यावेतन दिले जाते. मात्र राज्यातील इतर ठिकाणी निवासी डॉक्टरांना ५० हजाराच्यावर विद्यावेतन मिळते. मागीलवर्षी मुंबई मनपा फी आकारत नव्हती, मात्र यावर्षी एक लाख पंधरा हजार रुपये प्रत्येक इंटर्नशिप करणार्‍या विद्यार्थ्यांना आकारली जाते. निवासी डॉक्टर इतर डॉक्टरांप्रमाणे २४ तास सेवा देतात.

दवाखान्यात २४ तास फुकट काम: सध्या हे विद्यार्थी जी फी भरत आहेत तीच पगाराच्या रुपात त्यांना मनपा प्रशासन परत करते. एमबीबीएस होऊन मुंबई मनपा दवाखान्यात २४ तास फुकट काम करुन घेतले जात आहे. नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड या महानगरपालिका विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये पगार आहे. जगातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिका या निवासी डॉक्टरांना इतका पगार का देत नाही असा सवालही या संघटनेने केला आहे.

घराची देखील जबाबदारी: मुंबई मनपाच्या दवाखान्यात काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांवर त्यांच्या घरांचीही जबाबदारी आहे. मात्र एवढ्या कमी पगारात काम करून मुंबई मनपा अन्याय करत आहे. असा आरोपही बीएमसी मुंबई सीपीएस स्टुडंट असोसिएशनने दिलेल्या निवेदनात केला आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनिकेत मवाळ, डॉ.रोशन गायकवाड, डॉ. आदित्य मवाळ आदी प्रतिनिधींनी शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.

हेही वाचा: Uday Samant Met Sharad Pawar बारसू संदर्भात शरद पवार आणि उदय सामंत यांच्यात खलबते

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.