ETV Bharat / state

कोरोना सोबत असल्याचे गृहीत धरूनच महानगपालिका कर्मचारी कर्तव्यावर; कामगार संघटनांची माहिती

कोरोना दरम्यान रुग्णांवर उपचार करणे, शहरात स्वच्छता ठेवणे, नागरिकांना वेळेवर पाणी पुरवठा करणे, हातावर पोट असलेल्या व रस्त्या लगत फुटपाथवर राहणाऱ्या नागरिकांना अन्ना-पाण्याची पाकीटे पोहचवण्याचे काम पालिकेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. या कामादरम्यान तसेच कामावर येता-जाताना पालिकेच्या २ हजार ६८६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून १०६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आरोग्य आणि सफाई कामगारांची संख्या अधिक असल्याची माहिती कामगार संघटनांनी दिली.

BMC
मुंबई महानगरपालिका
author img

By

Published : Jul 21, 2020, 3:46 PM IST

मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत एक लाखापेक्षा जास्त रूग्ण आहेत. मुंबईकरांना आरोग्य, स्वच्छता, पाणी आदी सुविधा पुरवताना महानगरपालिकेच्या २ हजार ६८६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून १०६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतरही न डगमगता कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या कोणत्याही कामावर परिणाम होऊ दिला नाही. कोरोना आपल्या सोबत असल्याचे गृहीत धरूनच पालिकेचे कर्मचारी अधिकारी काम करत आहेत, अशी माहिती महानगरपालिका कामगार संघटनाच्या प्रतिनिधींनी दिली.

कोरोना सोबत असल्याचे गृहीत धरूनच महानगपालिका कर्मचारी कर्तव्यावर

मुंबईत ११ मार्चला कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला होता. त्यानंतर चारच महिन्यात कोरोनाने एक लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. या दरम्यान रुग्णांवर उपचार करणे, शहरात स्वच्छता ठेवणे, नागरिकांना वेळेवर पाणी पुरवठा करणे, हातावर पोट असलेल्या व रस्त्या लगत फुटपाथवर राहणाऱ्या नागरिकांना अन्ना-पाण्याची पाकीटे पोहचवण्याचे काम पालिकेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. या कामादरम्यान तसेच कामावर येता-जाताना पालिकेच्या २ हजार ६८६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून १०६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आरोग्य आणि सफाई कामगारांची संख्या अधिक असल्याची माहिती कामगार संघटनांनी दिली.

कामगारांच्या सुविधांकडे दुर्लक्ष -

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर महानगरपालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करत १०० टक्के उपस्थिती सक्तीची केली आहे. यामुळे कोरोनाचा आणखी प्रसार होऊ शकतो. यावर उपाय म्हणून १५ ते ५० टक्के उपस्थिती रोटेशन पद्धतीने असावी. कर्मचाऱ्यांना ट्रेन आणि बस १० मिनिटाच्या अंतराने उपलब्ध करून द्याव्यात. मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बरवरील ट्रेन सर्व स्थानकावर थांबवाव्यात. अनेक कर्मचारी लॉकडाऊनमुळे व परिसर कंटेन्मेंट झोन झाल्याने कामावर पोहचू शकले नाहीत. त्यांना विशेष कोविड रजा मंजूर करावी, अशी मागणी दी म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी केली आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची का?

महानगरपालिकेने आरोग्य विभागातचं बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली आहे. आरोग्य कर्मचारी कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावून काम करत आहेत. त्यांच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवला पाहिजे. वाहतुकीची साधने नसताना त्यांना वेळेवर कामावर पोहचणे शक्य नसताना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करणे चुकीचे आहे. पालिकेचे सर्व कामगार कोरोना सोबत असल्याचे गृहीत धरूनच काम करत आहेत, असे म्युनिसिपल मजदूर युनियनचे प्रदीप नारकर यांनी सांगितले.

कोरोनामुळे कर वसुली नाही -

राज्य सरकारकडून मिळणारा जीएसटीचा परतावा २०२२ मध्ये बंद होणार आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या घर आणि संपत्तीवर मालमत्ता कर वसूल करण्यास सुरुवात केली आहे. मालमत्ता करातून पालिकेला दरवर्षी ५ हजार ५०० कोटी रुपये इतके उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा पालिकेला होती. मात्र, पालिकेच्या अपेक्षेप्रमाणे ही वसुली झालेली नाही. २०१९-२० या आर्थिक वर्षात ४ हजार १५९.७४ कोटी इतका मालमत्ता कर वसूल करण्यात आला. कर निर्धारण विभागाचे कर्मचारी कोरोनाच्या कामात गुंतले असून ३ कर्मचारी आणि अधिकाऱयांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे यावर्षी कर वसुली झाली नसल्याची माहिती संगीता हसनाळे यांनी दिली.

मृतांमध्ये आरोग्य व सफाई कामगारांची संख्या अधिक -

मुंबई महानगरपालिकेकडून १० जुलैच्या आकडेवारीनुसार २ हजार १९८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी १०२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर १ हजार १७० कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली. पालिकेत त्यावेळी जे १०२ मृत्यू झाले त्यात २ खाते प्रमुख, कर व संकलन विभागाचे ३, सफाई विभाग २७, आरोग्य विभाग २५, अग्निशामक विभाग ८, सुरक्षा विभाग ७, परिमंडळ-१ मध्ये ५, परिमंडळ-२ मध्ये ४ तर इतर विभागातील २१ कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. २० जुलैला या आकडेवारीत वाढ होऊन २ हजार ६८६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून १०६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.