मुंबई : विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आपल्या सहकारी आमदारांसोबत भाजपात जाणार असल्याचे चर्चांना पूर्णविराम मिळाल्यानंतर काहीसं राज्यातील राजकीय वातावरण थंड झालं आहे. मात्र, दोन दिवसात राज्यात अनेक तर्कविर्तकांचा फुटलेल्या पेवांमुळे पक्षाचा कार्यकर्ता मात्र बुचकळ्यात पडला होता. उद्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .
शरद पवार करणार मार्गदर्शन : गेल्या दोन दिवसात अजित पवार यांच्या चर्चामुळे निर्माण झालेल्या गोंधळावर शरद पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. मुंबईतील घाटकोपर महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी काँग्रेसची ही मुंबईतील घाटकोपर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करणार आहे.
ध्येय मुंबई विकासाचे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित व मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ध्येय राष्ट्रवादीचे, मुंबई विकासाचे या शीर्षाखाली कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर होणार असल्याची माहीती प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. जयंत पाटील यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून होणार आहे. त्याचबरोबर खासदार प्रफुल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, अतिथी तटकरे ,अनिल देशमुख तसेच राजकीय वक्ते देखील मार्गदर्शन करणार आहे. शिबिरासाठी मुंबई विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 हजार पेक्षा जास्त प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहे
बैठकीत कोण कोणत्या विषयावर होऊ शकते चर्चा : पक्ष संघटनात्मक पुनर्वसन तसेच आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी करायची तयारी व मार्गदर्शक या मुद्द्यावरती चर्चा केली जाणार आहे. सध्या महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थिती महिलांची असुरक्षितता महागाई बेरोजगारी राज्यात बाहेर जाणारे उद्योग, महापुरुषांचा अवमान, वोट बँक मिळण्याच्या नादात लोकांच्या जीवाची पर्वा न करणे, सुशोभीकरण प्रकल्पाअंतर्गत मुंबईची खरे रुप दडवणे, नागरी सुविधा प्रश्नावर पूर्णपणे दुर्लक्ष या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
अजित पवार यांचे नाव वगळले ? : दरम्यान या मार्गदर्शन शिबिरामध्ये विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत नसल्यामुळे ते उपस्थित राहणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अजित पवार यांना वगळून ही बैठक होणार का तसेच अजित पवार यांना कार्यक्रम पत्रिकेतून वगळण्यामागे काय हेतू आहे, अशा विविध चर्चांना आता उधाण आले आहे. दरम्यान, या बाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी सांगितले की, अजित पवार मुंबईत नसल्याने त्याचे नाव कार्यक्रम पत्रिकेत नाही.