ETV Bharat / state

मुंबई : महापालिकेने रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटमधील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या खर्चापेक्षा कमी खर्चात इतर महापालिकांद्वारे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ऑक्सिजन प्लांटची निर्मिती क्षमता लक्षात न घेता करण्यात आलेले आरोप बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे फेटाळण्यात आले आहेत.

अॉक्सिजन प्लांट
ऑक्सिजन प्लांट
author img

By

Published : May 11, 2021, 10:46 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाच्या प्रसारादरम्यान ऑक्सिजनची कमतरता भासली होती. ही कमतरता पूर्ण करण्यासाठी पालिकेने १२ ठिकाणी ऑक्सिजन प्लांट बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला होता. भाजपाचा हा आरोप पालिकेने फेटाळला आहे. पारदर्शक पद्धतीने व स्पर्धात्मकरित्या राबविलेल्या निविदा प्रक्रियेनुसार सर्वात कमी दर देणाऱ्या प्रतिसादात्मक संस्थेस ऑक्सिजन प्लांटचे काम देण्यात येणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

पालिकेने आरोप फेटाळले

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेचे २ ऑक्सिजन प्लांट सध्या कार्यरत असून आणखी १२ ठिकाणी महापालिकेद्वारे ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ती निविदा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने, स्पर्धात्मक रित्या व नियमानुसारच राबविण्यात आली आहे. या अनुषंगाने आज काही माध्यमातून व समाज माध्यमातून काही आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या खर्चापेक्षा कमी खर्चात इतर महापालिकांद्वारे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ऑक्सिजन प्लांटची निर्मिती क्षमता लक्षात न घेता करण्यात आलेले आरोप बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे फेटाळण्यात आले आहेत.

४५ मेट्रिक टन ऑक्सिजन

ऑक्सिजन प्लांट किंवा इतर यंत्र प्रणालीचे दर व एकंदर खर्च हे त्याची निर्मिती क्षमता, निर्मिती करण्याच्या प्रकार, तांत्रिक बाबी, कामाची व्याप्ती व प्रमाण, अधिदानाच्या‌ व अटी व शर्ती (payment conditions), पुरवठा कालावधी (Delivery Period) इत्यादी बाबींवर अवलंबून ‌असतो, त्यामुळे तौलानिक अभ्यास करताना या बाबी लक्षात घेणे, अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर बृहन्मुंबई महापालिकेद्वारे १२ ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटची एकूण क्षमता ही ४५ मेट्रिक टन प्रतिदिन एवढी आहे. तर इतर महापालिकांच्या ऑक्सिजन प्लांटची क्षमता यापेक्षा कमी आहे.

निविदा प्रक्रियेचे काम अंतिम टप्प्यात

कोविड १९ या संसर्गजन्य रोगाने बाधित झालेल्या रुग्णांची ऑक्सिजनची पातळी झपाट्याने खाली घसरते. अशावेळी या रुग्णांना यांत्रिक पद्धतीने ऑक्सिजन देण्याची गरज असते. या अनुषंगाने बृहन्मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये, या दृष्टीने महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयांमध्ये सध्या ऑक्सिजन प्लांट कार्यरत आहेत.‌ तर याव्यतिरिक्त आणखी १२ ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारणीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यानुसार ऑक्सिजन प्लांट उभारणीच्या निविदा प्रक्रियेचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

काय आहे भाजपाचे आरोप?

मुंबई पालिकेने 12 ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्लांट इतर महापालिका उभारत असलेल्या प्लांट पेक्षा दुप्पट रक्कम खर्च करून उभारले जात आहेत. याची किंमत २५ कोटी असायला हवी असताना पालिका ८५ कोटी रुपये खर्च करत आहे. या ऑक्सिजन प्लांट उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपा नेते विनोद मिश्रा यांनी केला आहे. तर या प्रकरणात काळ्या यादीतील कंत्राटदार सहभागी झाल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

हेही वाचा -मुंबई महापालिकेच्या ऑक्सिजन प्लान्ट उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप; चौकशी करण्याची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.