ETV Bharat / state

मुंबई महापालिकेचे नगरसेवक होणार २३६; राज्य सरकारच्या निर्णयावर भाजपची टीका भाजपची टीका - bmc corporator no will become 236

सन 2001 आणि 2011 च्या जनगणनेनंतर निर्वाचित सदस्यांच्या संख्येत बदल करण्यात आलेला नाही. मात्र, आता याच दशकात 3.87 टक्के इतकी वाढ झाली आहे. वाढत्या लोकसंख्येमध्ये झालेली नागरीकरण ही बाब विचारात घेऊन नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. निर्वाचित सदस्य म्हणजेच नगरसेवकांची संख्या 9ने वाढणार असल्याने सदस्य संख्या 236 होणार आहे. यानंतर भाजपने टीका केली आहे.

bmc
मुंबई मनपा
author img

By

Published : Nov 10, 2021, 7:39 PM IST

मुंबई - मुंबईसह उपनगरात लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे. नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून देताना नगरसेवकांवर भार येतो. त्यामुळे राज्य सरकारने महानगर पालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून मंत्रिमंडळाने याला आज एकमताने मान्यता दिली. या निर्णयामुळे २२७ नगरसेवकांची संख्या आता २३६ होणार आहे. तर राजकीय हेतूने हा निर्णय घेतला असून सत्ताधारी शिवसेना निवडणुकीला घाबरला आहे अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली आहे.

मुंबईत दिवसेंदिवस लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उपनगरात हे प्रमाण अधिक आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे सोयी सुविधा पुरवताना अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो. परिणामी, लोकांचा रोष वाढतो. लोकप्रतिनिधींकडून याबाबत तक्रारी येऊ लागल्याने प्रभागांच्या विभाजनावर मुंबई महापालिकेने दिला आहे. आधीच पी उत्तर विभागाचे मालाड पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आता ९ प्रभागांच्या वाढीचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची सदस्यांची संख्या 227 इतकी आहे. सन 2001 आणि 2011 च्या जनगणनेनंतर निर्वाचित सदस्यांच्या संख्येत बदल करण्यात आलेला नाही. मात्र, आता याच दशकात 3.87 टक्के इतकी वाढ झाली आहे. वाढत्या लोकसंख्येमध्ये झालेली नागरीकरण ही बाब विचारात घेऊन नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. निर्वाचित सदस्य म्हणजेच नगरसेवकांची संख्या 9ने वाढणार असल्याने सदस्य संख्या 236 होणार आहे.

काँग्रेसच्या पाठींब्याशिवाय महापौर नाहीच -

मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महाविकास आघाडी सरकराने महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या व राज्यात सत्तधारी असलेल्या महाविकास आघाडीतील सहयोगी पक्ष असलेल्या काँग्रेसने स्वागत केले आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात ही वाढ झाली आहे. काही प्रभागात कमी मतदार तर काही प्रभागात जास्त मतदार होते. सर्व विभागात समान मतदार असल्यास आणि जास्त नगरसेवक असल्याने संपूर्ण मुंबईचा चांगल्या प्रकारे विकास करता येऊ शकणार आहे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली आहे. तसेच पालिकेच्या निवडणूकीत नगरसेवकांची कामे बघून मतदान केले जाते. पालिकेत गेल्या पाच वर्षात केलेले काम तसेच महाविकास आघाडीचे काम बघून महाविकास आघडीला त्याचा फायदा होईल. येत्या निवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक वाढतील. त्यामुळे काँग्रेसच्या पाठींब्याशिवाय मुंबईचा महापौर बनू शकणार नाही, असे रवी राजा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - ST Strike : लालपरी शंभर टक्के बंद; ९१८ जणांवर निलंबनाची कारवाई

भाजपकडून टीका -

राज्य सरकारने महापालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढवली आहे. सरकारने फक्त ९ नगरसेवकच का वाढवले. नगरसेवकांची संख्या वाढवण्याला लोकसंख्येचा किंवा जणगणनेचा आधार आहे का, असे प्रश्न भाजपचे नगरसेवक व प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी उपस्थित केले आहेत. केवळ राजकीय सोयीसाठी आणि तोंडावर आलेली निवडणूक पुढे ढकलण्यासाठी हा निर्णय शिवसेनेने घेतला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. या आधी राज्यातील महापालिकेमधील १५ टक्के जागा वाढवल्या त्यावेळी मुंबई महापालिकेतील जागा वाढवल्या नव्हत्या. आधी या जागा वाढवता आल्या असत्या. मात्र, त्यावेळी या जागा वाढवल्या नाहीत. प्रभाग रचनेत बदल करून निवडणूक जिंकू असा डाव यशस्वी होणार नाही, हे लक्षात आल्यावर प्रभागांची संख्या वाढवल्यावर प्रभाग रचना करण्यास आपल्याला मोकळे रान मिळेल, या राजकीय हेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. ते निवडणुकीला घाबरले आहेत, असा आरोप शिरसाट यांनी केला आहे.

देशात जनगणना झाली नसताना लोकसंख्या कुठे वाढली, कुठे वॉर्ड वाढणार कुठे कमी होणार हे सरकारने सांगितलेले नाही. प्रशासनाला हाताशी धरून असुरक्षितता निर्माण झाली आहे. सत्ताधाऱ्यांना परबहाव दिसू लागला आहे. यासाठी ही नगरसेवकांची संख्या वाढवण्यात आली आहे. ज्या पद्धतीने कामकाज सुरु आहे यामुळे मुंबईकरांच्या मनात एक वेगळा संदेश गेला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.

सध्याचे संख्या बळ -

शिवसेना - ९७
भाजपा - ८३
काँग्रेस - २९
राष्ट्रवादी - ८
समाजवादी - ६
एमआयएम - २
मनसे - १

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.