ETV Bharat / state

..तर प्रकल्प कधीही उभा राहू शकत नाही; पालिका आयुक्तांकडून मेट्रोची तळी उचलण्याचा प्रयत्न - bmc

कांजूरमार्ग येथील जागेचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून या ठिकाणी कारशेड उभारण्याचा विचार केल्यास मेट्रो प्रकल्प कधीही उभा राहू शकत नाही. असे सांगत मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी मेट्रोची तळी उचलण्याचा प्रयत्न केला.

पालिका आयुक्तांकडून मेट्रोची तळी उचलण्याचा प्रयत्न
author img

By

Published : Sep 4, 2019, 10:02 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये होऊ घातलेल्या मेट्रोचे कारशेड कांजूरमार्ग येथील पर्यायी जागेत बांधावे अशी मागणी केली जात आहे. मात्र, असे केल्यास खासगी जमीन मालकाला ५००० कोटी रुपये द्यावे लागतील. कांजूरमार्ग येथील जागेचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून या ठिकाणी कारशेड उभारण्याचा विचार केल्यास मेट्रो प्रकल्प कधीही उभा राहू शकत नाही. असे सांगत मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी मेट्रोची तळी उचलण्याचा प्रयत्न केला.

मुंबईतील मेट्रोच्या कारशेडसाठी झाडे तोडण्यास पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा विरोध आहे. त्यानंतरही कारशेडसाठी २७०० वृक्ष तोडण्याला वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली आहे. झाडे तोडण्याला विरोध म्हणून सत्ताधारी शिवसेनेच्यावतीने सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी स्थायी समिती सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. त्यावेळी पालिका प्रशासनाचा खुलासा करताना पालिका आयुक्त बोलत होते.

mumbai
मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी

हेही वाचा - आरे वाचवण्यासाठी नागरिक रस्त्यावर; लोकांचा विरोध मग प्रकल्प कशासाठी?

कारशेडसाठी आरेच का -

यावेळी बोलताना कांजूर येथील जागा शासकीय नसल्याने त्या जागेची मागणी करणे शक्य नाही. कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागा घेण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागेल. कारशेड हा मेट्रोचा आत्मा असून कांजूर येथे कारशेड केल्यास लांब पडेल. आरे कॉलनीत कारशेड केल्यास बॅटरी चार्ज करणे, गॅरेजमधून नियंत्रण ठेवणे शक्य होईल. त्यामुळेच, आरेतील जागेवरच कारशेड योग्य असेल असे आयुक्तांनी सांगितले.

वायू प्रदूषण कमी होईल -

मेट्रो ३ प्रकल्पासाठी आरेतील झाडे तोडण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणात २१ जुलै २०१७ मध्ये आला होता. हा प्रस्ताव मंजूर होण्यास २ वर्ष लागली. आरेतील झाडांबाबत नागरिकांच्या ८३ हजार हरकती आल्या, त्याचे सविस्तर उत्तर पालिकेच्या पोर्टलवर दिले असून कोणीही विरोध केलेला नाही. आरेतील झाडे तोडल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होईल, उष्णता वाढेल हे चुकीचे आहे. मेट्रोमुळे मुंबईमधील वायुप्रदूषण कमी होईल असे आयुक्तांनी सांगितले.

हेही वाचा - 'आरे'मध्ये एका झाडाच्या बदल्यात ६ झाडे लावू मात्र, मेट्रोसारखा पथदर्शी प्रकल्प थांबवू नये - अभिजित सामंत

आरेतील २ टक्के जागेवरच कारशेड -

आरेतील जागा १२०० हेक्टरवर असून कारशेडसाठी फक्त २ टक्के म्हणजेच ३३ हेक्टर जागा वापरली जाणार आहे. आरेतील ही जागा वनजमीन नसून ती दूध डेअरीची जागा आहे. आरेत एकूण ४ लाख ९७ हजार झाडे असून त्यातील २७०० झाडे तोडण्यात येणार आहेत. त्यातील वड, पिंपळाच्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार नाही. एका झाडाच्या बदल्यात ५ ते ६ झाडे लावण्यात येणार आहेत. विकासकांनाही झाडे लावणे बंधनकारक करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.

हेही वाचा - आरे कॉलनीतील कारशेडसाठी २,२३८ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव मंजूर, पर्यावरण प्रेमींची निदर्शने

Intro:मुंबई - मुंबईमध्ये होऊ घातलेल्या मेट्रोचे कारशेड कांजूरमार्ग येथील पर्यायी जागेत बांधावे अशी मागणी केली जात आहे. मात्र असे केल्यास खासगी जमीन मालकाला पाच हजार कोटी रुपये द्यावे लागतील. कांजूरमार्ग येथील जागेचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून या ठिकाणी कारशेड उभारण्याचा विचार केल्यास मेट्रो प्रकल्प कधीही उभा राहू शकत नाही असे सांगत मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी मेट्रोची तळी उचलण्याचा प्रयत्न केला. Body:मुंबईतील मेट्रोच्या कारशेडसाठी झाडे तोडण्यास पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा विरोध आहे. त्यानंतरही कारशेडसाठी २७०० तोडण्याला वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली आहे. झाडे तोडण्याला विरोध म्हणून सत्ताधारी शिवसेनेच्यावतीने सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी स्थायी समिती सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. त्यावेळी पालिका प्रशासनाचा खुलासा करताना पालिका आयुक्त बोलत होते.

कारशेडसाठी आरेच का -
यावेळी बोलताना कांजूर येथील जागा शासकीय नसल्याने त्या जागेची मागणी करणे शक्य नाही. कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागा घेण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागेल. कारशेड  हा मेट्रोचा आत्मा असून कांजूर येथे कारशेड केल्यास लांब पडेल, आरे काॅलनीत कारशेड केल्यास बॅटरी चार्ज करणे, गॅरेजमधून नियंत्रण ठेवणे शक्य होईल. त्यामुळेच आरेतील जागेवरच कारशेड योग्य असेल असे आयुक्तांनी सांगितले.

वायू प्रदूषण कमी होईल -
मेट्रो ३ प्रकल्पासाठी आरेतील झाडे तोडण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणात २१ जुलै २०१७ मध्ये आला होता. प्रस्ताव मंजूर होण्यास दोन वर्ष लागली. आरेतील झाडांबाबत नागरिकांच्या ८३ हजार हरकती आल्या, त्याचे सविस्तर उत्तर पालिकेच्या पोर्टलवर दिले असून कोणीही विरोध केलेला नाही. आरेतील झाडे तोडल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होईल, उष्णता वाढेल हे चुकीचे आहे. मेट्रोमुळे मुंबईमधील वायुप्रदूषण कमी होईल असे आयुक्तांनी सांगितले.

आरेतील २ टक्के जागेवरच कारशेड -
आरेतील जागा १२०० हेक्टरवर असून कारशेडसाठी फक्त २ टक्के म्हणजेच ३३ हेक्टर जागा वापरली जाणार आहे. आरेतील ही जागा वन जमीन नसून ती दूध डेअरीची जागा आहे. आरेत एकूण ४ लाख ९७ हजार झाडे असून त्यातील २७०० झाडे तोडण्यात येणार आहेत. त्यातील वड, पिंपळाच्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार नाही. एका झाडाच्या बदल्यात ५ ते ६ झाडे लावण्यात येणार आहेत. विकासकांनाही झाडे लावणे बंधनकारक करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.

बातमीसाठी पालिका आयुक्त परदेशी यांचा फोटो किंवा पालिकेचा फोटो वापरावाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.