मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका ५ कामगार नालेसफाई करताना गुदमरले. यातील एकाचा मृत्यू झाला आहे. इतर चौघांची प्रकृती गंभीर आहे. दक्षिण मुंबईतील (ग्रँटरोड पश्चिम) नाना चौक स्काय वॉकच्या खाली नेसबाग बिल्डिंग शेजारी भूमीगत नाल्यांची साफसफाई करताना हा प्रकार घडला आहे.
अत्यवस्थ ४ कामगारांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अगोदर या चौघांना जवळच्याच भाटीया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना आता नायर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पाण्याची पाईप लाईन दुरुस्त करण्यासाठी हे सर्वजण खाली उतरले होते. त्यावेळी गॅस पाईप लाईन फुटली आणि कामगार गुदमरले अशी माहिती मिळत आहे.
राजेश निकम असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर उमेश पवार, शांताराम भाकटे, सुरेश पवार, बाळासाहेब भावरे अशी इतर चौघांची नावे आहेत. हे सर्व कर्मचारी पालिकेच्या भायखळा येथील देखरेख विभागात (मेंटेनन्स विभाग) कार्यरत आहेत.
या घटनेवरुन पुन्हा एकदा महापालिका सफाई कामगारांच्या विषयी किती असंवेदनशील आहे, हे दिसून आले आहे.