ETV Bharat / state

बीकेसीला लवकरच नवा साज! नवीन पदपथ, सायकल ट्रक, पार्किंग, ई-चार्जिंग आणि बरंच काही - BKC NEW METRO

बीकेसीत भविष्यात वाढणारी वाहनांची, नोकरदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत. तर लवकरच बीकेसीतून मेट्रो धावणार आहे. त्यामुळे ही संख्या आणखी वाढणार आहे. तेव्हा येथील पायाभूत सुविधा वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेत महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी येथील अंतर्गत पायाभूत सुविधा नव्याने विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

bkc will modified in upcoming time over new metro project
बीकेसी
author img

By

Published : Feb 9, 2021, 10:27 PM IST

मुंबई - वांद्रे-कुर्ला संकुलाचा विकास आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याचा प्रयत्न सातत्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) केला जात आहे. त्यानुसार येथे अनेक अत्याधुनिक सुविधा पुरवल्या जात आहेत. तर आता यापुढे जात बीकेसीला नवा साज देण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. लवकरच बीकेसीत मेट्रो धावणार असून येथे येणाऱ्याची संख्या वाढणार आहे. त्यामुळे येथील अंतर्गत सुविधा वाढवणे, त्या आणखी अत्याधुनिक करण्यासाठी आता एमएमआरडीएने कंबर कसली आहे. त्यानुसार सुमारे 31 कोटींहून अधिक खर्च करत येथे नव्या अंतर्गत सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. अगदी नव्या पदपथापासून ई-चार्जिंग, सायकल ट्रक अशा अनेक नवीन सुविधा येथे निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे.

दोन टप्प्यात नव्या सुविधा -

बीकेसीत भविष्यात वाढणारी वाहनांची, नोकरदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत. तर लवकरच बीकेसीतून मेट्रो धावणार आहे. त्यामुळे ही संख्या आणखी वाढणार आहे. तेव्हा येथील पायाभूत सुविधा वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेत महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी येथील अंतर्गत पायाभूत सुविधा नव्याने विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दोन टप्प्यात बीकेसीतील सुविधाच्या नूतनीकरणाचा प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 18.11 कोटी तर दुसऱ्या टप्प्यात 14.12 कोटी रुपये खर्च करत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.

हेही वाचा - ठाणे : तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये चार कंपन्यांना आग

जी ब्लॉकमध्ये 8 नवे जंक्शन -

या प्रकल्पाअंतर्गत जी ब्लॉक येथे 8 नवीन जंक्शन तयार करण्यात येणार आहेत. यातील 4 जंक्शन एप्रिल 2021 मध्ये पूर्ण करण्यात येणार आहेत. तर पदपथ नव्याने बांधत ते शक्य तितके मोठे आणि आकर्षक असतील यावर भर देण्यात येणार आहे. तर मोठ्या संख्येने पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच नव्या कचरा कुंड्या, बसण्यासाठी नवीन बाकडे, नवीन-आकर्षक साइनबोर्डस, सायकल ट्रक, ई-चार्जिंग यासह अनेक सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.