मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते लोकार्पण झालेले एमएमआरडीएने बांधलेले फेज 2 मधील कोविड रुग्णालय अद्याप पालिकेला हस्तांतरण झाले नसल्याचे समोर आले आहे. तसेच या रुग्णालयाला अजून मेडिकल स्टाफच उपलब्ध झाला नसून तशा मागणीचे पत्र देखील संबंधित प्रशासनाला लिहिण्यात आले आहे.
17 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बिकेसी येथील एमएमआरडीएने बांधलेले फेज 2 मधील कोविड रुग्णालय पालिकेला हस्तांतरण करून त्याचा लोकार्पण सोहळा देखील पार पडला होता. याबाबत पालिकेकडे विचारणा केली असता, प्रत्यक्षात हे रुग्णालय अजून पालिकेला हस्तांतरणच झाले नसून त्याचे काम पूर्ण होणे बाकी आहे, असे मुंबई महापालिकेचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांनी सांगितले.
29 जूनला कोविड रुग्णालय बिकेसीच्या व्यवस्थापनाने राज्य सरकारचे आरोग्य संचालक व मुंबई महापालिकेचे आरोग्य विभागाचे संचालक यांना पत्र लिहून रुग्णालयाला मनुष्यबळ पुरविण्याची मागणी केली आहे. फेज 2 मधील कोविड रुग्णालयाच्या लोकार्पणाला आज 15 दिवस झाले तरी रुग्णालय लोकांच्या सेवेत उपलब्ध झाले नाही.
18 दिवसांत रुग्णालय बांधण्याचे काम पूर्ण केले. मग रुग्णालय रुग्णांच्या सेवेत सुरू होण्यास तत्परता का दाखवली नाही, असा सवाल मनसे नेते अखिल चित्रे यांनी उपस्थित केला आहे. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री व्हर्चुअल उद्घाटन करतात, तसेच हे कोविड रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी सुरू होणार नसेल तर ते कोविड व्हर्चुअल म्युझियम म्हणून घोषित करावे, अशी संतप्त प्रतिक्रिया अखिल चित्रे यांनी व्यक्त केली.
बिकेसी येथील फेज 2 मधील कोविड रुग्णालयामध्ये एक हजार खाटांची व्यवस्था आहे. यात 104 अतिदक्षता विभागातील खाट, 12 डायलिसिस खाकट, ऑक्सिजन व विना ऑक्सिजन खाट, सिटीस्कॅन मशीन, पोर्टेबल एक्सरे मशीन, ईसीजी मशीन, प्लस ऑक्सिमीटर, शवागर (12 क्षमता) आदी सुविधा आहे.
या स्टाफची आहे बिकेसीतील फेज 2 मधील कोविड रुग्णालयाला गरज
108 आयसीयू खाटांसाठी आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. त्यात मेडिसिन आणि चेस्ट विभागासाठी प्रत्येकी 3 वरिष्ठ अधिकारी, मेडिसिन, भुलतज्ञ, चेस्ट मेडिसिन असलेले 108 निवासी डॉक्टर, आयसीयू (अतिदक्षता विभाग), इएनटी (कान, नाक, घसा), कार्डिलॉजिस्ट, सर्जरी आदींसाठी 12 तासांच्या शिफ्टसाठी 72 डॉक्टर, 576 परिचारिका, 5 इतर पॅरा मेडिकल स्टाफ, 96 वॉर्डबॉय, 54 सफाई कर्मचारी, 2 न्यूट्रेशनिस्ट, 6 फार्मासिस्ट, 6 एक्सरे टेक्निशियन, 3 वरिष्ठ स्टाफ नर्स
हेही वाचा - अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा एसटीचा मोफत प्रवास उद्यापासून बंद