ETV Bharat / state

भारतीय जनता युवा मोर्चाचे मंत्रालयाबाहेर आंदोलन - मुंबई शहर बातमी

भजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन केले. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांना स्वतंत्रपणे काम करु दिले जात नाही, असे म्हणत कार्यकर्त्यांनी सरकाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

spot photo
भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना पोलीस
author img

By

Published : Nov 2, 2020, 3:47 PM IST

Updated : Nov 2, 2020, 10:38 PM IST

मुंबई - लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर सरकार हल्ला करत आहे. माध्यमांना स्वतंत्रपणे काम करू दिले जात नाही. माध्यमांची मुस्कटदाबी केली जात असल्याचा आरोप करत आज (दि. 2 नोव्हेंबर) भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

भारतीय जनता युवा मोर्चाचे मंत्रालयाबाहेर आंदोलन
जोरदार घोषणाबाजी, पोलिसांची कारवाई
यावेळी भाजयुमो कार्यकर्त्यांनी भारत माता की जय व तसेच सरकारविरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला. भाजयुमो आंदोलन करणार असल्यामुळे मंत्रालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कोरोनाच्या प्रादुर्भावाची खबरदारी व आंदोलनाची परवानगी नसल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा - साखर कारखान्यांच्या लिलावात अजित पवारांच्या कुटुंबीयांना फायदा; ईडीची माहिती

Last Updated : Nov 2, 2020, 10:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.