ETV Bharat / state

Tejendra Singh Tiwani on jitendra awhad : जितेंद्र आव्हाड जिथे दिसतील तिथे त्यांच्या कानशिलात लगाऊ, तेजेंद्र सिंह तिवानींचे वक्तव्य - भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाकडून मोर्चा काढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Tejendra Singh Tiwani on jitendra awhad
तेजेंद्र सिंह तिवानी
author img

By

Published : Feb 6, 2023, 2:17 PM IST

जितेंद्र आव्हाड जिथे दिसतील तिथे त्यांच्या कानशिलात लगाऊ

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाकडून काढण्यात आलेल्या मोर्चातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जरी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे, तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना दोन कानाखाली लावण्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. असा इशारा भाजपचे युवा मोर्चाचे नेते तेजेंद्र सिंह तिवानी यांनी दिला आहे. तसेच आपण राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाऊन जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोर्चा दरम्यान भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोंना काळे फासण्यात आले.

पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या दिशेने जात असताना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेरच्या परिसरामध्ये पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना अडवले. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरा समोर येऊ नये याची दक्षता घेत पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यातच अडवल्यानंतर त्याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला चपलांनी भारत त्यांच्या छायाचित्राला काळे फासण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला.

भाजप कार्यकर्त्यांची वाट पाहतोय : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी महाप्रसाद तयार करून ठेवला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांची आम्ही वाट पाहत होतो. मात्र या नंतरही ते कधी येणार असतील तर त्यांचे आम्ही महाप्रसाद देऊन स्वागत करू असा चिमटा राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे अध्यक्ष महेबुब शेख यांनी काढला. राष्ट्रवादी काँग्रेस महापुरुषांच्या बाबत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्य त्यांच्या नेत्यांना आठवत नाही का? राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली. याबाबतही भारतीय जनता पक्ष चकार शब्द काढत नाही. दुसरीकडे मात्र जितेंद्र आव्हाड यांनी कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केले नाही. तरीही ते काही बोलल्यानंतर त्या वक्तव्याचा विपर्यास करून याबाबत भारतीय जनता पक्ष राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महबूब शेख यांनी केला आहे.

हेही वाचा : Balasaheb Thorat on Congress : अन बाळासाहेब थोरातांनी अखेर भावनांची वाट मोकळी केली, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.