ETV Bharat / state

Pravin Darekar Reaction : मध्यप्रदेशात पुन्हा मारणार भाजपाच बाजी, प्रवीण दरेकरांनी दौऱ्यावरुन आल्यावर व्यक्त केला विश्वास - 21 आमदार तेलंगाणाच्या दौऱ्यावर

मध्यप्रदेश आणि तेलंगाणाच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाने महाराष्ट्रातील आमदारांची एक-एक टीम दोन्ही ठिकाणी पाठवली होती. या आमदारांनी ७ दिवस मध्यप्रदेश तसंच तेलंगाणामध्ये राहून तिकडची राजकीय परिस्थिती व एकंदरीत सरकारी योजनांचा जनतेला भेटलेला लाभ याचा आढावा घेऊन ते महाराष्ट्रात परत आले आहेत. महाराष्ट्रातील 47 आमदार मध्यप्रदेशच्या तर 21 आमदार तेलंगाणाच्या दौऱ्यावर होते.

pravin darekar
भाजप नेते, प्रवीण दरेकर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2023, 7:34 PM IST

मुंबई : भाजपाच्या महाराष्ट्रातील आमदारांकडे तेलंगाणा आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांतील निवडक विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली होती. या आमदारांनी आपल्या 7 दिवसांच्या मुक्कामात मध्य प्रदेश तसंच तेलंगाणामधील वेगवेगळ्या भागांना भेटी दिल्या. भाजपाच्या केंद्रीय समित्यांचे सदस्य हेसुद्धा दौऱ्यावर होते. त्यांनीसुद्धा महाराष्ट्रातील आमदारांना वेगवेगळ्या विषयांत मार्गदर्शन केलं. मध्यप्रदेश आणि तेलंगाणा या राज्यातील दौऱ्यावर असलेल्या आमदारांच्या हालचालींवर वरिष्ठ नेतृत्व ॲपच्या मदतीने लक्ष ठेवून होतं.

लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न : दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्रातील आमदारांचा दिवस सकाळी ९ वाजल्यापासून सुरू व्हायचा. पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालयातून त्यांना दैनंदिन कार्यक्रमही दिला असायचा. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी त्यांना करावी लागायची. यामध्ये भाजपाच्या बूथ प्रमुखांच्या बैठका घेण्याबरोबरच काही बूथ प्रमुखांच्या घरी भेट देणं, रॅली काढणं, तेथील व्यावसायिकांशी संवाद साधणं, त्यांच्यासोबत भोजन अथवा नाश्ता घेणं, युवकांशी संवाद साधनं, तेथील समाजातील मान्यवरांच्या गाठीभेटी घेणं यांचा समावेश होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षांच्या कार्यकाळात जे काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, त्या निर्णयाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणं याला फार महत्त्व होतं. मध्यप्रदेश सरकार जरी आपलं असलं तरीसुद्धा कुठल्या मुद्द्यावर आपण कमी पडतो. विरोधकांनी लावून धरलेले मुद्दे कुठले आहेत. लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न कुठले आहेत, ते कसे सोडवता येतील याचा विचार करायचा होता. तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के. सी. राव यांच्या विरोधातील मुद्दे कोणते आहेत, कुठले मुद्दे हे निवडणुकीत कळीचे ठरू शकतात. या सर्व बाबींचा ‘फीडबॅक’ सुद्धा आमदारांनी पक्षाकडे दिला आहे.

पुन्हा निवडणुकीत भाजपाची सत्ता : मध्यप्रदेशच्या दौऱ्यावरुन परतलेले भाजपा नेते, आमदार प्रवीण दरेकर म्हणाले आहेत की, मध्य प्रदेशात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटना, सरकारच्या माध्यमातून होत असलेली कामे व त्या-त्या मतदार संघाला दिशा देण्यासाठी अनेक आमदार महाराष्ट्रातून मध्यप्रदेशमध्ये गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील अनेक योजना त्या त्या ठिकाणी लोकांच्या घरापर्यंत पोचल्या असल्याचं चित्र आम्हाला तिथं दिसून आलं. विशेष करून मी जबलपूरला होतो. त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची, लाडली बहना, मां कौशल्या योजना, शिका व कमवा अशा योजना या प्रचंड यशस्वी झाल्या आहेत. त्याचबरोबर अंगणसेविका असतील आशा वर्कर यांना 10 हजारावरून 13 हजार रुपये मानधन देण्यात आलं आहे. या सर्व बाबी तळागळापर्यंत पोहोचवण्यात मध्यप्रदेश सरकार यशस्वी झालं असून पुन्हा निवडणुकीत भाजपाची सत्ता येणार, याची शाश्वतीही प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. 9 years of PM Modi: भाजपचे महिनाभर देशव्यापी महाजनसंपर्क अभियान, महाराष्ट्रातील नऊ नेत्यांवर समन्वयाची जबाबदारी
  2. Pravin Darekar : उद्धव ठाकरेंसह काँग्रेसवर प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल; Watch Video
  3. Praveen Darekar Criticizes Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे उत्तम चोर माणूस, दरेकरांचा हल्लाबोल

माहिती देताना आमदार प्रवीण दरेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.