ETV Bharat / state

अन्य शिक्षकांना वर्क फ्रॉम होम द्या, रेल्वे प्रवासाच्या परवानगीवरून शिक्षक आक्रमक

लोकलमध्ये दहावीच्या मूल्यमापन करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतरांना परवानगी दिली असली तरी ती किचकट व वेळखाऊ प्रक्रिया आहे. शिक्षण उपसंचालकांकडून नावे येतील मग रेल्वे पास ऑनलाइन एसएमएसच्या माध्यमातून रेल्वे वितरित करेल. यात अनेक दिवस जातील त्यापेक्षा शाळेच्या ओळखपत्रावर पास देण्यात यावीत, केवळ दहावीच्या शिक्षकांना परवानगी दिली आहे. मग पहिली ते नववीच्या शिक्षकांना वर्क फ्रॉम होमचे आदेश द्यावेत. दहावीचे मूल्यमापन संपल्यावर संबंधित शिक्षकांना पण वर्क फ्रॉम होमचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी दिली आहे.

रेल्वे
रेल्वे
author img

By

Published : Jun 17, 2021, 10:39 PM IST

मुंबई - इयत्ता दहावीच्या मूल्यमापनाशी संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शाळेतील अन्य शिक्षकांच्या 50 टक्के उपस्थितीबाबत सरकारने दिलेले आदेश हे गैर लागू आहेत. शिक्षण उपसंचालकांकडून नावे येतील मग, रेल्वे पास ऑनलाइन एसएमएसद्वारे मिळणार असल्याने ही प्रक्रिया किचकट आणि वेळ खावू आहे. त्यासाठी आणखी आठ दिवस जाणार आहेत. त्यामुळे सरकारने सरसकट परवानगी द्यावी, अशी मागणी ही शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.

शिक्षक भारतीकडून निर्णयाचा निषेध

इयत्ता दहावीचा निकाल वेळेत घोषित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. मूल्यांकन करून विद्यार्थिनिहाय माहिती राज्य मंडळाकडे पाठवणे, श्रेणी तक्ता तयार करणे, इत्यादी कामे करण्यासाठी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याबाबतचा पाठविलेला प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला होता. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाचे गांभीर्य व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहावी मूल्यमापनाशी संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपनगरीय रेल्वेप्रवासाची मुभा दिली. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराज आहे. लोकल प्रवासात दहावी सोडून इतर शिक्षक, मुख्याध्यापक, इतर विषय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना वगळण्यात आलेले आहे. दहावीच्या शिक्षकांची माहिती घेऊन त्यांनाच केवळ ट्रेनने प्रवास करण्याचा पास देण्याचा सरकारचा विचार केला आहे. त्यामुळे शिक्षक भारतीकडून याचा निषेध करण्यात येत असल्याचे जालिंदर सरोदे यांनी सांगितले.

अन्य शिक्षकांना वर्क फ्रॉम होम द्या..!

लोकलमध्ये दहावीच्या मूल्यमापन करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतरांना परवानगी दिली असली तरी ती किचकट व वेळखाऊ प्रक्रिया आहे. शिक्षण उपसंचालकांकडून नावे येतील मग रेल्वे पास ऑनलाइन एसएमएसच्या माध्यमातून रेल्वे वितरित करेल. यात अनेक दिवस जातील त्यापेक्षा शाळेच्या ओळखपत्रावर पास देण्यात यावीत, केवळ दहावीच्या शिक्षकांना परवानगी दिली आहे. मग पहिली ते नववीच्या शिक्षकांना वर्क फ्रॉम होमचे आदेश द्यावेत. दहावीचे मूल्यमापन संपल्यावर संबंधित शिक्षकांना पण वर्क फ्रॉम होमचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी दिली आहे.

हेही वाचा - मोलकरीण बनून हात साफ करायची, 50 चोरीचे गुन्हे करणाऱ्या महिलेला अखेर अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.