ETV Bharat / state

Bawankule On Advertisement : पक्षात संभ्रम निर्माण होईल अशी कृती करू नका- चंद्रशेखर बावनकुळे - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

एकनाथ शिंदे - फडवणीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतानाच एका जाहिरातीवरून या युतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे - भाजप दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना संभ्रम निर्माण करणारी कृती करू नये, असा सज्जड इशारा दिला आहे. मुंबईत ते बोलत होते.

Bawankule On Advertisement
Bawankule On Advertisement
author img

By

Published : Jun 15, 2023, 7:44 PM IST

चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

मुंबई : जाहिरात नाट्यावरून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावे सुरू झालेले आहेत. "देशात मोदी, राज्यात शिंदे" या जाहिरातीवरून भाजपच्या गोटात राज्यात प्रचंड प्रमाणात नाराजी पसरली आहे. दुसऱ्या दिवशी सर्व समावेशक अशी युतीची जाहिरात देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न जरी केला असला तरीसुद्धा भाजपमध्ये अंतर्गत नाराजी राहिली आहेच.

तब्येतीचे कारण पुढे, नाराजी जाहिरातीवर : एकनाथ शिंदे - फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतानाच एका जाहिरातीवरून या युतीमध्ये मिठाचा खडा पडतो की काय? अशी शक्यता निर्माण झाली होती. देशात मोदी, राज्यात शिंदे, अशा पद्धतीची जाहिरात प्रमुख वर्तमानपत्रात दिल्या कारणाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भाजप नेते, कार्यकर्ते शिंदे गटावर नाराज होते. याचा प्रत्यय, शासन आपल्या दारी या कोल्हापूरच्या कार्यक्रमात दिसून आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच्या कोल्हापूरच्या दौऱ्यातून काढता पाय घेतला. तेव्हा त्यांच्या तब्येतीचे कारण पुढे करण्याचे काम भाजपकडून नाही, तर शिंदे गटाकडून करण्यात आले. त्यांच्या कानाला इजा झाली असल्याकारणाने डॉक्टरांनी त्यांना हवाई दौरा करण्यास मनाई केली असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते, आमदार, मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले होते. परंतु दुसऱ्याच दिवशी प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये शिंदे-फडणवीस सरकारच्या कामांच्या कार्याचा गौरव, त्याचबरोबर देवेंद्र फडवणीस यांचा फोटो असलेली जाहिरात दिल्याने अगोदरच्या जाहिरातीवरून असलेली नाराजी दूर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.

कानाची इजा एका जाहिरातीने बरी झाली? : जाहिरातीच्या दोनच दिवसांनी म्हणजे आज, गुरुवार १५ जून रोजी पालघर जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून एकाच हेलिकॉप्टरने पालघरला पोहोचले. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री यांचा दुखणारा कान, त्यांच्या कानाच्या पडद्याला झालेली इजा एका जाहिरातीने बरी झाली की काय? अशी चर्चा दबक्या आवाजात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या गटात सुरू झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघरचा हवाई दौरा एकत्र केला असला तरी पालघरला हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी ते स्वतंत्र गाडीने गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्यासोबत येण्यास सांगितले. परंतु "तुम्ही पुढे निघा, मी येतो", असं सांगत देवेंद्र फडवणीस त्यांच्यासोबत न बसता ते दुसऱ्या गाडीने कार्यक्रम स्थळी गेले, यावरूनही चर्चा रंगल्या. देवेंद्र फडवणीस अद्यापही नाराज असल्याचे सांगितले गेले. तशा बातम्या ही सर्वत्र पसरल्या.

आमचे बॉण्डिंग फार मजबूत : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या सुरू आहेत. ही बाब देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आली. पालघरच्या कार्यक्रमस्थळी भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये या बाबींचा उल्लेख केला. आमचा प्रवास एकत्रित २५ वर्षाचा आहे. मागील वर्षभरात तो अधिक घट्ट झाला आहे. आमची युती इतकी घट्ट आहे की एका जाहिरातीने त्यावर काही परिणाम होणार नाही. आमचे सरकार तकलादू सरकार नाही. या अगोदरच्या सरकारमध्ये भाषण कोणी करायचं? यावरून त्यांच्यात खडाजंगी व्हायची असा टोलाही त्यांनी पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारला लगावला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपल्या भाषणात सध्या जाहिरातीवरून जे काही राजकारण सुरू आहे, त्याबाबत बोलताना, आमची दोस्ती २५ वर्षापासूनची असून आमचं बॉण्डिंग फार मजबूत असल्याचे त्यांनी म्हटल आहे. यह फेविकॉल का जोड है, टूटेगा नही. तसंच या जोडीला कोणी जय-वीरू तर कोण धर्मवीर असे म्हणत असलं तरी सुद्धा खुर्चीसाठी, स्वार्थासाठी ही युती झालेली नाही. जे स्वार्थासाठी एकत्र आले होते, त्यांना जनतेने दूर लोटलं आहे. काही झालं तरी आमच्यात वाद निर्माण होणार नाही. आमचं सरकार फेसबुक लाईव्ह करणार नाही आहे, असं सांगत त्यांनीही अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

पुन्हा अशी कृती कोणी करू नये : देवेंद्र फडवणीस यांचा फोटो ही न लावता, त्याचबरोबर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील प्रबल दावेदार असणारी जाहिरात प्रकाशित करून शिवसेनेच्या शिंदे गटाने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचं काम केलं होतं. परंतु ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच दुसऱ्या दिवशी पूर्णकश जाहिरात देऊन झालेला वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु सध्याच्या परिस्थितीत अशा पद्धतीचे वाद होऊ नयेत म्हणूनच कुणीही अशा पद्धतीची वक्तव्य किंवा कृती करू नये, असा सज्जड इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष, चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. अगोदरची जाहिरात कोणी दिली, कशी दिली हा विषयाचा आता संपला असून यापुढे अशा पद्धतीने कुणीही वागू नये असं बावनकुळे यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा - Keshav Prasad Maurya : भाजपला घरचा आहेर, उत्तर प्रदेश उपमुख्यमंत्र्यांची देशात महागाई वाढली असल्याची कबुली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.