ETV Bharat / state

Chitra Wagh Demand : उर्फी जावेदरुपी स्त्री देहाचा बाजार रोखा, चित्रा वाघ यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या मॉडेल उर्फी (BJP Pradesh Mahila Morcha President chitra wagh) जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Police Commissioner vivek phansalkar) तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी यांची भाजपा प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ यांनी भेट घेतली. त्यांनी उर्फी जावेदवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली (chitra wagh demand action on urfi javed) आहे.

Chitra Wagh
चित्रा वाघ
author img

By

Published : Jan 1, 2023, 12:11 PM IST

मुंबई : किळसवाणे अंगप्रदर्शन करणाऱ्या मॉडेल उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त यांची भेट घेत भाजपा प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ (BJP Pradesh Mahila Morcha President chitra wagh) यांनी मागणी केली आहे. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Police Commissioner vivek phansalkar) यांना पत्र देऊन मॉडेल उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी भाजपा प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. मुंबई पोलीस आणि देखिल या अर्जाची दखल घेतली असल्याने उर्फी जावेदच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता (chitra wagh demand action on urfi javed) आहे.

समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय : चित्रा वाघ यांनी पोलिसांना पत्राद्वारे उर्फी जावेद या अभिनेत्रीने भर रस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार, विचार स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली (chitra wagh demand) नसेल. स्त्री देहाचे असे मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे ? याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही. मात्र, केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल, तर तिने ते चार भिंतीच्या आड जरूर करावे. मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत. याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी (action on actress urfi javed) आहे.

उर्फी जावेदला धमकी : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्फी जावेद हिला जीवे मारण्याच्या आणि बलात्काराची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात नवीन गिरी नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. अभिनेत्री उर्फी जावेद अश्लील भाषेत शिवीगाळ आणि व्हॉट्सअॅपवर कॉल करून बलात्काराची धमकी मिळाली होती. वेगवेगळ्या नंबरवरून कॉल रेकॉर्डिंग पाठवण्यात आले होते. याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात नवीन गिरी नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. विचित्र फॅशन सेन्समूळे ओळखली जाणारी उर्फी जावेद ही कधी कोणती फॅशन करेल याचा काही भरोसा नाही. उर्फी जावेद कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असते आणि त्यामूळे ट्रोलच्या निशाण्यावर येते. आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिमपर्यंत बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिले (actress urfi javed) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.