मुंबई - शेतकऱ्यांच्या वीज बील दरातील सवलतीवरून विरोधकांनी परिषदेत घोषणाबाजी करत गोंधळ घातला. गदारोळ निर्माण झाल्याने सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी २० मिनिटसाठी सभागृह तहकूब केले.
राज्यातील हॉटेल्स, दारूची दुकाने, बिल्डरांना महाविकास आघाडी सरकारकडून सवलतींची खैरात दिली जात आहे. मात्र शेतकऱ्यांवर भरमसाठ वीज बील आकारण्यात येते. नांदेडमध्ये एका शेतकऱ्याला ११ लाख ९० हजार रुपयांचे बील आले आहे. त्यामुळे संपूर्ण गावाची वीज कापल्याचा प्रकार परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उघडकीस आणला. तसेच शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिल मंजुरीसाठी कर्ज काढावे, अशी मागणी केली.
सरकारकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर देताना, माहितीची नोंद घेतल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे विरोधकांनी विधान परिषदेत आक्रमक भूमिका घेत गदारोळ घातला. त्यामुळे २० मिनिटसाठी सभागृह तहकूब केल्याची घोषणा सभापती रामराजे नाईक-निंबाळकर केली.
हेही वाचा - धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा- प्रविण दरेकर
हेही वाचा - काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांच्या भावाला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक