ETV Bharat / state

वैयक्तिक स्वार्थासाठी 'त्यांनी' जनादेशाचा अपमान केला - नड्डा - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा

नवी मुंबईत भाजपचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सकाळच्या सत्रात भाषण करताना शिवसेनेवर टीका केली. महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला सत्ता स्थापन करण्यासाठी जनादेश दिला होता. पण, आमच्या सोबतीदाराने वैयक्तिक स्वार्थासाठी जनादेशाचा अपमान केला, त्यामुळे अभद्र युती सत्तेत आली आहे, असे ते म्हणाले. भविष्यात आम्हाला कोणाशीच युती करावी लागू नये, म्हणून ईश्वरानेच ही संधी दिली असावी, असेही ते म्हणाले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा
author img

By

Published : Feb 16, 2020, 4:30 PM IST

मुंबई - महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला सत्ता स्थापन करण्यासाठी जनादेश दिला होता. पण, आमच्या सोबतीदाराने वैयक्तिक स्वार्थासाठी जनादेशाचा अपमान केला, त्यामुळे अभद्र युती सत्तेत आली आहे, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केला. नवी मुंबईत सुरू असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात सकाळच्या सत्रात ते बोलत होते.

नड्डा म्हणाले की, आपल्यासोबत विश्वासघात झाला असला तरी आता परिस्थिती अनुकूलतेमध्ये बदलण्याचे आव्हान भाजप यशस्वीपणे पेलून दाखवेल, भविष्यात आम्हाला कोणाशीच युती करावी लागू नये म्हणून ईश्वरानेच ही संधी दिली आहे. पुढच्या निवडणुकीत भाजप एकतर्फी निवडणूक लढवून स्वबळावर सत्ता आणेल, तोपर्यंत आम्ही विरोधक म्हणून काम करत राहू, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

हेही वाचा - हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा; ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान

राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी तळापर्यंत जाऊन काम केले पाहिजे. केवळ पोस्टमनची भूमिका बजावू नका. आणि प्रत्येक जण देवेंद्र फडणवीस म्हणून काम करा. फडणवीस यांच्या काळात, शेती, उद्योग, पायाभूत सुविधा यांचा विकास झाला. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गावातील, गल्लीतील नेता बनून काम करावे आणि भारत निर्माणामध्ये सहभागी व्हावे आणि महाराष्ट्राचा चेहरा बदलावा, असेही आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा - 'शिवसेनेने पाठीत सुरा भोकसला, पुन्हा एकत्र येणार नाही'

आमच्या केंद्रातील सरकारने जम्मू काश्मीरचा निर्णय हा '३७०' रद्द करण्यासाठी नव्हे, तर तेथील विकासासाठी घेतला आहे. येथे दलित, मुस्लीम यांना विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण नव्हते, त्यासाठी लवकरच आम्ही फेररचना करण्याची प्रक्रिया सुरू करू, असेही ते म्हणाले. 'सीएए'वर आक्षेप काय हे कोणी सांगत नाही, केवळ मताचे राजकारण केले जात आहे. मोदी यांच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था ही 5 ट्रेलियनपर्यंत जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.